---Advertisement---

Timed Out । शाकिबनेच दाखवला स्वार्थीपणा! दिग्गजाने सांगितला मैदानात घडला प्रकार

Angelo Mathews Ian Bishop
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये सोमवारी (6 नोव्हेंबर) एक नाट्यमय प्रकार घडला. श्रीलंका आणि बांगलादेश हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर विश्वचषकातील 38वा सामना खेळत होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन संघाचा दिग्गज अँजेलो मॅथ्यूज याने या सामन्यात अशा पद्धतीने विकेट गमावली, जे पाहून अनेकांना विश्वास बसला नाही. याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज ईयान बिशप यांनी लाईव्ह सामन्यादरम्यान मोठा खुलासा केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सोमवारी (6 नोव्हेंबर) एखाद्या खेळाडूला टाईम आऊट नियमानुसार बाद दिले गेले. हा खेळाडू दुसरा कोणी नसून श्रीलंकेचा दिग्गज अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) होता. मॅथ्यूजने या सामन्यात एकही चेंडू न खेळता विकेट गमावली. कारण ठरला, बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन. माध्यमांतील वृत्तांनुसार मॅथ्यूज 25व्या षटकात सदिरा समरविक्रमा याने विकेट गमावल्यानंतर वेळेत खेळपट्टीवर आला होता. पण अचानक त्याच्या हेलमेटची तक्रार समोर आली, ज्यामुळे तो तीन मिनिटांच्या आतमध्ये डावातील पहिला चेंडू खेळू शकला नाही. परिणामी शाकिबने पंचांकडे विकेटसाठी अपील केली आणि मॅथ्यूजला बाद घोषित केले गेले.

असे असले तरी, शाकिबचे हे वर्तन अनेकांच्या मते हे खेळ भावणेला धरून नव्हते. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टिका देखील होत आहे. लाईव्ह सामन्यात शाकिब आणि मॅथ्यूज यांच्यात चर्चा झाल्याचेही दिसले. पण दोघांमधील नेमकी चर्चा काय झाली, हे समोर आले नाही. वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज ईयान बिशप सध्या विश्वचषक स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांनी लाईव्ह सामन्यात अशी प्रतिक्रिया दिली की, “पंचांनी अपील मागे घेण्यासाठी शाकिबला दोन वेळा विचारले, पण दोन्ही वेळी ‘नाही’ असेच म्हणाला.” बिशप टाईम आऊटचे हे प्रकरण घडल्यानंतर मैदानात मॅथ्यूजशी चर्चा करताना दिसले होते.

त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर शाकिबविरोधातील वातावरण अधिकच तापले आहे. चाहत्यांच्या मते शाकिबने खेळाडू वृत्ती दाखवत अपील मागे घेतली पाहिजे होत, जेणेकरून मॅथ्यूजला श्रीलंकन संघासाठी योगदान देता आले असते. मात्र, बांगलादेशी कर्णधाराने पूर्णपणे आपल्या संघाचा विचार केला आणि अपील मागे घेतली नाही.

दरम्यान, श्रीलंकने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात 279 धावांची खेळी केली आणि सर्व विकेट्स गमावल्या. यात चरिथ असलंका याने सर्वाधिक 108 धावांचे योगदान दिले. मथूम निसांका आणि सदिरा समरविक्रमा यांनी प्रत्येकी 41-41 धावांची खेळी करून विकेट गमावल्या. बांगलादेशसाठी तंजीम हसन साकिब याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शाकिब अल हसन आणि शोरिफूल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर मेहदी हसन मिराझ याला एक विकेट मिळाली. (Angelo Mathews talking to Ian Bishop after the timed out incident)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
बांगलादेश – तंजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराझ, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम

श्रीलंका – पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महीश थीक्षणा, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका

महत्वाच्या बातम्या –
“तुला लाज वाटायला हवी”, मॅथ्यूजला Time Out पद्धतीने बाद दिल्यावर शाकिब नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
काय आहे टाईम आऊट नियम, ज्यात दिग्गज अँजेलो मॅथ्यूजही फसला; वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---