---Advertisement---

“तुला लाज वाटायला हवी”, मॅथ्यूजला Time Out पद्धतीने बाद दिल्यावर शाकिब नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

---Advertisement---

विश्वचषक 2023 स्पर्धेत सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात 38 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात एक अनोखी आणि वादग्रस्त घटना देखील घडली. या सामन्यात बांगलादेश संघाने अपील केल्यानंतर श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज ऍंजेलो मॅथ्यूज याला टाईम आउट पद्धतीने बाद देण्यात आले. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याच्यावर टीकेची जोड उठवली जात आहे.

नक्की काय घडले?

श्रीलंकेच्या डावात 25 व्या षटकात सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अनुभवी ऍंजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला. मॅथ्यूज हा वेळेत खेळपट्टीवर दाखल झाला. मात्र, गार्ड घेत असताना त्याच्या हेल्मेटची पट्टी तुटली. त्यावेळी त्याने दुसरे हेल्मेट मागवले. दुसरे हेल्मेट येईपर्यंत सदिरा बाद झालेला वेळ पकडून दोन मिनिटे उलटून गेली होती. क्रिकेटच्या नियमानुसार नवीन फलंदाज दोन मिनिटात पुढील चेंडू खेळला नाही तर त्याला बाद देण्यात येते. मात्र, हा निर्णय सर्वस्वी विरोधी कर्णधाराचा असतो. विरोधी कर्णधाराने पंचांकडे अपील केल्यास पंच याबाबत निर्णय घेतात.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील ही पहिलीच घटना घडली. टाईम आउट पद्धतीने बाद होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो पहिला फलंदाज ठरला. मात्र यानंतर पंचांना हा निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणारा बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

एका चाहत्याने लिहिले,

‘शाकिब तुला लाज वाटायला हवी’ दुसऱ्या एकाच्या हाताने लिहिले शाकिब हा जागतिक दर्जाचा चिडका आहे.’

यासोबतच अनेक माजी क्रिकेटपटूंनी देखील त्याच्यावर शरसंधान साधले आहे.

(Twitter Slams Shakib Al Hasan After Time Out Appeal Against Angelo Mathews)

महत्वाच्या बातम्या – 
भारतीय दिग्गजाला तब्बल ‘एवढ्या’ लाखांना चुना, पैसे दुप्पट करण्याच्या नादात बसला सगळंच घालवून
विराटच्या 79 शतकांचं सेलिब्रेशन पाहा एका मिनिटात । VIDEO

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---