भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्रा फसवणुकीचा बळी ठरला आहे. या फसवणुकीविरोधात त्याने एफआयआरही दाखल केला आहे. एफआयआरमध्ये त्याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे माजी व्यवस्थापक कमलेश पारिख आणि त्यांचा मुलगा ध्रुव पारीख यांचे नाव घेतले आहे. याप्रकरणी पिता-पुत्रावर कलम 406 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये आकाश चोप्रा (Akash Chopra) याने कमलेश आणि ध्रुव यांना चपलांच्या व्यवसायासाठी 57.8 लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे. ही रक्कम त्याला 30 दिवसांत परत करायची होती. आकाशला या रकमेसह 20 टक्के व्याज देण्याचे वचन दिले होते, परंतु एक वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतरही माजी क्रिकेटपटूला केवळ 24.5 लाख रुपये परत करण्यात आले होते.
आकाशने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, “आम्हाला हा करार नोटरी करून मिळाला होता, ज्यामध्ये ध्रुव मला 30 दिवसांच्या आत 20 टक्के नफ्यासह संपूर्ण पैसे परत करेल असे स्पष्ट म्हटले होते. त्यासाठी निश्चित तारखांचे काही आगाऊ चेकही देण्यात आले होते. मात्र, एक वर्ष उलटले असून केवळ 24.5 लाख रुपये परत आले आहेत. तर दोन चेकही बाऊन्स झाले आहेत.”
चोप्राने असेही लिहिले आहे की, “मी या संदर्भात ध्रुवच्या वडिलांशीही बोललो होतो आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या वतीने करारातील अटी पूर्ण करण्याचे सांगितले होते पण त्यांनीही काही केले नाही. कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे, परंतु पिता-पुत्रांनी कोणत्याही प्रकारे उत्तर दिलेले नाही. 33.3 लाख रुपयांची मूळ रक्कम वसूल करणे ही माझ्यासाठी मोठे आव्हान बनले आहे.” (The Indian legend spent almost so many lakhs spending everything on the sound of doubling the money)
म्हत्वाच्या बातम्या
इकडं भारत जिंकला अन् तिकडं नवरदेव-नवरीने कुटुंबासह केला विजयाचा जल्लोष, व्हिडिओ पाहतच राहाल
‘दिवस रात्र विराटचा फोटो…’, विराटच्या शतकानंतर सीमा हैदरची लक्षवेधी प्रतिक्रिया