श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषक 2023चा 38वा सामना खेळला जात आहे. श्रीलंकन दिग्गज अँजेलो मॅथ्यूज याने या सामन्यात केलेली चूक त्याला आणि श्रींलंकन संघाला माहागात पडली. मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट पद्धतीने बाद होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पण अनेकांना टाईम आऊटचा नियम नक्की आहेत तरी काय, हेच माहीत नाहीये.
श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. अँजेलो मॅथ्यूड (Angelo Mathews) डावातील 25व्या षटकात फलंदाजीसाठी आला. यावेळी सदिरा समरविक्रमा याने विकेट गमावल्यानंतर मॅथ्यूज फलंदाजीसाठी खेळपट्टीच्या दिशेने निघाला. मात्र, तुटलेल्या हेलमेटसह तो खेळपट्टीवर आल्यामुळे त्याला पहिला चेंडू तीन मिनिटांच्या आतमध्ये खेळता आला नाही. अशातच बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने संधी साधत पंचांकडून मॅथ्यूजच्या विकेटसाठी अपील केली. पंचांसोबत काही वेळ चर्चा केल्यानंतर अखेर मॅथ्यूने त्यांचा निर्णय स्वीकारला आणि पव्हेलियनच्या दिशेने परतला.
टाईम आऊट नियमानुसार एखादा फलंदाज बाद झाला किंवा काही कारणास्तव त्याने खेळपट्टी सोडली. तर पुढचा फलंदाज तीन मिनिटांच्या आतमध्ये खेळण्यासाठी खेळपट्टीवर उपस्थित असला पाहिजे. जर नवीन फलंदाज तीन मिनिटांच्या आतमध्ये खेळपट्टीवर तयार नसेल, तर त्याला बाद करार दिला जाऊ शकतो. मॅथ्यूज या सामन्यात तीन मिनिटांच्या आतमध्ये खेळपट्टीवर आला. पण त्याचे हेलमेट तुटलेले असल्यामुळे यात तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. मॅथ्यूजने तुटलेल्या हेलमेटसह खेळाला सुरुवात केली असती आणि नंतर हेलमेट बदलले असते, त्याला आपली विकेट गमवावी लागली नसती. (What is the time out rule in cricket?)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
बांगलादेश – तंजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराझ, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम
श्रीलंका – पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महीश थीक्षणा, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका
महत्वाच्या बातम्या –
लज्जास्पद! एकही चेंडू न खेळवता मॅथ्यूजला बांगलादेशने केले बाद, वाचा काय घडलं
मॅथ्यूज ‘या’ पद्धतीने बाद होताच अंपायरशी भिडला, मैदानाबाहेर जाताना रागात फेकलं हेल्मेट; Video तुफान व्हायरल