विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस रंजक होत आहे. स्पर्धेतील 38वा सामना सोमवारी (6 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जातोय. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने या सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सामन्याच्या मध्यात घडलेल्या एका घटनेने सर्वांना चकित केले.
श्रीलंकेच्या डावात 25 व्या षटकात सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अनुभवी ऍंजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला. त्याने गार्ड घेतल्यानंतर काही वेळानंतर पंचांनी त्याला बाद दिले. तो कोणताही चेंडू न खेळता बाद झाला. टाईम आऊट पद्धतीने बाद होणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला.
Angelo Mathews – Timed out….. the most weirdest dismissal ever, took more than 2 minutes to be at crease. Mainly because of strap issue in his helmet. #SriLankaCricket #srilankacricketboard #SLvsBan #Bangladesh #angelo #mathews #INDvsSA #INDvSA #Shakib pic.twitter.com/gyybOUs6io
— Nishant Rana (@nishantranaCRM) November 6, 2023
त्याचे झाले असे की, मॅथ्यूज हा वेळेत खेळपट्टीवर दाखल झाला. मात्र, गार्ड घेत असताना त्याच्या हेल्मेटची पट्टी तुटली. त्यावेळी त्याने दुसरे हेल्मेट मागवले. दुसरे हेल्मेट येईपर्यंत सदिरा बाद झालेला वेळ पकडून दोन मिनिटे उलटून गेली होती. क्रिकेटच्या नियमानुसार नवीन फलंदाज दोन मिनिटात पुढील चेंडू खेळला नाही तर त्याला बाद देण्यात येते. मात्र, हा निर्णय सर्वस्वी विरोधी कर्णधाराचा असतो. विरोधी कर्णधाराने पंचांकडे अपील केल्यास पंच याबाबत निर्णय घेतात.
यापूर्वी क्रिकेट इतिहासात अशा प्रकारे कोणत्याही कर्णधाराने टाईम आऊट बादची मागणी केली नव्हती. मात्र, बांगलादेश संघाने ही मागणी केल्याने पंचांना मॅथ्यूजला बाद द्यावे लागले. यानंतर बांगलादेश संघावर मोठी टीका होत आहे.
(Angelo Mathews becomes first cricketer to be given timed out in the history of International cricket)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय दिग्गजाला तब्बल ‘एवढ्या’ लाखांना चुना, पैसे दुप्पट करण्याच्या नादात बसला सगळंच घालवून
विराटच्या 79 शतकांचं सेलिब्रेशन पाहा एका मिनिटात । VIDEO