भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रविवारी (5 नोव्हेंबर) आपला 35वा वाढदिवस दिमाखात साजरा केला. विराटच्या वाढदिवशीच भारत आणि दक्षिण आफ्रिका हा रोमांचक सामना खेळला गेला. विराटने या सामन्यात शतकी खेळी करत स्वतःला वाढदिवसाची भेट दिला. जगभरातील दिग्गजांकडून यासाठी त्याचे कौतुक झाले आणि सोबतच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. अशातच पाकिस्तानचा माजी फलंदाज उमर अकमल याने विराटला दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरत आहेत.
उमर अकमल पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज फलंदाज राहिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर देखील तो नेहमी माध्यमांमध्ये चर्चेत असतो. रविवारी (5 नोव्हेंबर) त्याने विराट कोहली (Virat Kohli) याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मात्र, त्याच्या ज्या पद्धतीची पोस्ट करू शुभेच्छा दिल्या ते हास्यास्पद ठरत आहे. उमरने ही पोस्ट इंग्लिशमध्ये लिहिली असून वाक्य अर्थपूर्ण नसल्याचे दिसते. याच कारणास्तव अनेकांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे.
Happy birthday brother @imVkohli to king in India sir @sachin_rt 🙌🏻 Virat kohli @BCCI pic.twitter.com/VNY9UWC9z4
— Umar Akmal (@Umar96Akmal) November 5, 2023
दरम्यान, उमर अकमल याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर पाकिस्तानसाठी त्याने 16 कसोटी, 121 वनडे आणि 84 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 1003, 3194 आणि 1690 धावांचे योगदान संघासाठी दिले. दुसरीकडे विराट कोहली याने आवल्या 35व्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांच्या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची बरोबरी केली. सचिन आणि आता त्याच्यानंतर विराट या दोघांनीही वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49-49 शतके केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर सध्या 79 शतके असून तो जगातील सचिननंतर दुसरा सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. (Umar Akmal Wishes Virat Kohli On His 35th Birthday)
महत्वाच्या बातम्या –
“तुला लाज वाटायला हवी”, मॅथ्यूजला Time Out पद्धतीने बाद दिल्यावर शाकिब नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
दिल्लीत तळपली असलंकाची बॅट, मॅथ्यूजला टाईम आऊट करणाऱ्या बांगलादेश संघापुढे 280 धावांचे लक्ष्य