वनडे विश्वचषक स्पर्धेचा 38वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. श्रीलंकेने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. चरिथ असलंका याने केलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर श्रीलंकन संघ 49.3 षटकांमध्ये 279 धावांपर्यंत मजल मारू शकला. सलामीवीर पथूम निसांका आणि सदिरा समरविक्रमा यांनीही महत्वापूर्ण धावांचे योगदान दिले.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. नाणेफेक गमावल्यानंतर श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करावी लागली. पहिल्या चार फलंदाजांपैकी एकही फलंदाज श्रीलंकेसाठी अर्धशतक करू शकला नाही. पण पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या चरिथ असलंका याने थेट शतक ठोकले. त्याने 105 चेंडूत त्याने 108 धावांची खेळी केली. सलामीवीर पथूम निसांका याने 36 चेंडूत 41 धावा, तर चौथ्या क्रमांकावर खेळताना सदिरा समरविक्रमा याने 42 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. दिल्ली अँजेलो मॅथ्यूज () महत्वाच्या वेळी शुन्यावर बाद झाला. नियमानुसार तीन मिनिटांच्या आतमध्ये मॅथ्यूज फलंदाजीसाठी उपलब्ध राहू शकला नाही. परिणामी शाकिब अल हसन याची अपील लक्षात घेता पंचांनी त्याला टाईम आऊट घोषित केले.
सलामीवीर कुसल परेला अवख्या 4 धावा करू शकला, तिसऱ्या क्रमांकावर आलेला कुलस मेंडिस 19, तर सातव्या क्रमांकावर आलेल्या धनंजया डी सिल्वा याने 34 धावांची खेळी केली. महीश थिक्षणा यांने 31 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. कुसल रजिथा दोन चेंडू खेळून एकही धाव न करता तंबूत परतला. दुष्मंथा चमिरा याच्या रुपात संघाने आपली 10 वी विकेट गमावली. दिलशान मदुशंका एकही धाव न करता खेळपट्टीवर नाबाद राहिला.
दुसरीकडे बांगलादेशसाठी तंजीम हसन शाकिब याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कर्णधार शाकिब अल हसन आणि शोरिफूल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. मेहदी हसन मिराझ याने 1 विकेट घेतली. (SL vs BAN Charith Asalanka takes Sri Lanka to a total of 279.)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
बांगलादेश – तंजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराझ, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम
श्रीलंका – पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महीश थीक्षणा, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका
महत्वाच्या बातम्या –
‘दिल्लीत घडलेला प्रकार अतिशय घाणेरडा!’, गंभीरसह दिग्गजांच्या तिखट प्रतिक्रियांचा महापूर
मॅथ्यूज ‘या’ पद्धतीने बाद होताच अंपायरशी भिडला, मैदानाबाहेर जाताना रागात फेकलं हेल्मेट; Video तुफान व्हायरल