---Advertisement---

‘दिल्लीत घडलेला प्रकार अतिशय घाणेरडा!’, गंभीरसह दिग्गजांच्या तिखट प्रतिक्रियांचा महापूर

Angelo-Mathews-And-Gautam-Gambhir
---Advertisement---

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज अँजेलो मॅथ्यूज हा सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) विचित्र पद्धतीने बाद झाला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 38व्या सामन्यात मॅथ्यूजच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरून आता भारतासह इतर संघांच्या माजी खेळाडूंनीही प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये गौतम गंभीरचाही समावेश आहे. चला तर, दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहूयात…

अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) बांगलादेश संघाविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी सहाव्या क्रमांकावर उतरला होता. मात्र, तो यादरम्यान चुकीचे हेल्मेट घेऊन मैदानावर आला. यावेळी त्याने संघाला दुसरे हेल्मेट घेऊन येण्यासाठी इशारा केला. पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता. अशात बांगलादेशच्या खेळाडूंनी पंचांकडे टाईम-आऊटची अपील केली. पंचांनी अपील मान्य केल्यामुळे अँजेलो मॅथ्यूज टाईम-आऊट (Angelo Mathews Time Out) पद्धतीने बाद झाला. तो अशाप्रकारे बाद होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच खेळाडू ठरला.

दिग्गजांच्या प्रतिक्रिया
अँजेलो मॅथ्यूज अशाप्रकारे बाद होताच आजी-माजी खेळाडूंनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून ट्वीट करत मत मांडले. त्याने लिहिले की, “दिल्लीत आज जे काही घडले, ते अतिशय दयनीय होते.”

भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यानेही लिहिले की, “चला आता हेच राहिलं होतं.”

याव्यतिरिक्त भारताचा माजी खेळाडू एस बद्रिनाथ (S Badrinath) याने शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याचा उल्लेख करत लिहिले की, “जर मी शाकिब असतो, तर कर्णधार म्हणून मी अपील केली नसती. मी तर हेल्मेटपेक्षा जास्त तुटलो असतो.”

तसेच, श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि समालोचक रसेल अर्नाल्ड (Russel Arnold) याने म्हटले की, “आयसीसीच्या प्लेइंग कंडिशननुसार 2 मिनिटांत फलंदाजी करण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे.”

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) हादेखील याविषयी व्यक्त झाला. त्याने आपल्या ट्वीटमध्ये घड्याळाच्या इमोजीचा समावेश करत लिहिले की, “हे नक्कीच चांगले नव्हते.”

टाईम आऊटसाठी एमसीसी नियम
विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर, येणाऱ्या फलंदाजाला 3 मिनिटाच्या आत क्रीझवर येऊन चेंडू खेळायचा असतो. जर असे झाले नाही, तर विरोधी संघ फलंदाजासाठी टाईम-आऊटची अपील करू शकतो आणि पंच नवीन फलंदाजाला बाद घोषित करू शकतात.

अँजेलो मॅथ्यूजची कारकीर्द
मॅथ्यूजच्या कारकीर्दीवर नजर टाकली, तर अष्टपैलूने श्रीलंका संघाकडून 106 कसोटी, 225 वनडे आणि 78 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 45.44च्या सरासरीने 7361 धावा आणि 33 विकेट्स, वनडेत 40.69च्या सरासरीने 5900 धावा आणि 122 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, टी20त त्याने 25.51च्या सरासरीने 1148 धावा आणि 38 विकेट्सही घेतल्या आहेत. (reaction on angelo mathews time out in ban vs sl match cwc 23 gautam gambhir aakash chopra and dale steyn tweet)

हेही वाचा-
काय आहे टाईम आऊट नियम, ज्यात दिग्गज अँजेलो मॅथ्यूजही फसला; वाचा सविस्तर
मॅथ्यूज ‘या’ पद्धतीने बाद होताच अंपायरशी भिडला, मैदानाबाहेर जाताना रागात फेकलं हेल्मेट; Video तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---