ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

CWC 2023: अखेर बांगलादेशचाच नागिण डान्स! श्रीलंका वर्ल्डकपमधून ‘आऊट’

विश्वचषक 2023 स्पर्धेतील 38वा सामना सोमवारी (6 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात खेळला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात बांगलादेशने तीन गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कुसल परेराच्या रुपाने पहिला धक्का लवकर बसला. कर्णधार कुसल मेंडिस, सदिरा समरविक्रमा व पथुम निसंका यांनी उपयुक्त खेळ्या करत श्रीलंकेला सामन्यात जिवंत ठेवले. अनुभवी ऍंजेलो मॅथ्यूज याला टाईम आउट पद्धतीने शून्यावर बाद दिल्याने सामन्यात मोठा वाद निर्माण झाला. मात्र, चरिथ असलंका याने एकाकी झुंज देत शानदार शतक झळकावले. त्यामुळे श्रीलंकेने 379 पर्यंत मजल मारली.

या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशसाठी सर्व फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. नजमुल हसन शांतो व शाकिब अल हसन यांनी अर्धशतके करत शक्ती भागीदारी करून संघाला सामन्यात पुढे ठेवले. अखेरच्या टप्प्यात श्रीलंकेने काही बळी मिळवत सामन्यात रंगत आणली मात्र अखेर बांगलादेशने विजय संपादन केला.

(Bangladesh Beat Srilanka By 7 Wickets In World Cup Shanto Shakib Shines)

महत्वाच्या बातम्या –
“तुला लाज वाटायला हवी”, मॅथ्यूजला Time Out पद्धतीने बाद दिल्यावर शाकिब नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
काय आहे टाईम आऊट नियम, ज्यात दिग्गज अँजेलो मॅथ्यूजही फसला; वाचा सविस्तर

Related Articles