क्रिकेट प्रेमींसाठी शनिवारचा (दि. 21 ऑक्टोबर) दिवस खूपच खास आहे. यामागील कारण म्हणजे, विश्वचषक 2023 स्पर्धेतील एक नाही, तर दोन सामने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यातील पहिला सामना म्हणजेच विश्वचषकातील 19व्या सामन्याला नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका संघात सकाळी 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. तसेच, दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 2 वाजता खेळला जाणार आहे. त्यापूर्वी पहिल्या सामन्याची नाणेफेक पार पडली, जी नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट ए़डवर्ड्स याने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात नेदरलँड्स आपला मागील सामन्यातील संघ उतरवणार आहे. त्यांनी ताफ्यात कोणताही बदल केला नाहीये. दुसरीकडे, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस (Kusal Mendis) याने सांगितले आहे की, संघात तीन खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. तसेच, या त्याच्या खेळाचा आणि कर्णधाराचाही आनंद घेत आहे.
विश्वचषकातील कामगिरी
नेदरलँड्स संघाची वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर त्यांनी आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तसेच, तिसऱ्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 38 धावांनी विजय मिळवला. तसेच, श्रीलंका संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले असून, त्यांना तिन्ही सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. अशात या सामन्यातून ते पुनरागमनाचा प्रयत्न करतील. (Netherlands have won the toss and have opted to bat against sri lanka)
विश्वचषकातील 19व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
नेदरलँड्स
विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीडे, सीब्रँड एंजेलब्रेच, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
श्रीलंका
पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका
हेही वाचा-
चल…! पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत ऑस्ट्रेलियाचा Points Tableमध्ये राडा, थेट ‘या’ स्थानी घेतली झेप
पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजयानंतर गगनाला भिडला कॅप्टन कमिन्सचा आनंद; म्हणाला, ‘बाबर आणि इफ्तिखार…’