वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (28 ऑक्टोबर) दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स असा खेळला गेला. कोलकाता येथे होत असलेला हा विश्वचषकातील पहिला सामना आहे. या सामन्यात नेदरलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश समोर 229 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. नेदरलँड्ससाठी कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली.
Another fighting 50 for the skipper!
Leading from the front as always, Captain Edwards.#NEDvsBAN #CWC23 pic.twitter.com/ON5ozzFYbX
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) October 28, 2023
मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 309 ध वांनी पराभूत केल्यानंतर या सामन्यात नेदरलँड्स संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मात्र, मॅक्स ओडाऊड व विक्रमजीत हे दोन्ही सलामी वीर केवळ चार धावांमध्ये माघारी परतले. त्यानंतर बारेसी व एकरमन यांनी 59 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. बारेसीने 41 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने संघाची धुरा आपल्या हाती घेत 89 चेंडूंमध्ये 68 धावा केल्या.
सायब्रंड याने 35 व वॅन बीक याने 23 धावा करत संघाला 229 पर्यंत पोहोचवले. बांगलादेश संघासाठी मिराज वगळता सर्व गोलंदाज बळी घेण्यात यशस्वी ठरले.
(Netherlands Post 229 Against Bangaladesh In ODI World Cup Captain Scott Edwards Shines)
हेही वाचा-
मॅक्सवेलने मारला World Cup 2023चा सर्वात लांब षटकार, तुटला ‘या’ भारतीयाचा रेकॉर्ड, पाहा अफलातून व्हिडिओ
ट्रेविस हेडने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला चौथा खेळाडू