---Advertisement---

धूल चटा दो अब तो अंग्रेजो को! हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया

---Advertisement---

चेन्नई येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पुढील दुसरा कसोटी सामना आजपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू होणार आहे. तत्पुर्वी भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने सोशल मीडियाद्वारे या सामन्यातून पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

झाले असे की, पंड्याने शुक्रवारी (१२ फेब्रुवारी) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आपले सराव करतानाचे काही फोटो शेअर केले. त्यातील एका फोटोत पंड्या झेल पकडताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो कर्णधार विराट कोहलीसोबत थांबल्याचे दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, सामन्याच्या दिवसाची तयारी.

पंड्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याला तू दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे का असा प्रश्न विचारला आहे. काहींनी त्याला या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने तर, धुल चटाओ अब तो अंग्रेजो को, अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/VimalTank16/status/1360235513244880897?s=20

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराटने मालिकेची सुरुवात होण्यापुर्वी पंड्या कसोटीत खेळणार असल्याचे सांगितले होते. या अष्टपैलूची खासकरुन त्याच्या गोलंदाजीसाठी संघात निवड केली असल्याचेही त्याने सांगितले होते. परंतु दुखापतीमुळे पंड्या गोलंदाजी करू शकत नसल्याने पहिल्या कसोटीत त्याला संधी देण्यात आली नव्हती. आता दुसऱ्या कसोटीतून तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. परंतु अजून अधिकृतपणे यासंदर्भात घोषणा करण्यात आलेली नाही.

या २७ वर्षीय शिलेदाराने ऑगस्ट २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. इंग्लंडविरुद्ध रोज बाउल स्टेडियमवर हा सामना झाला होता. त्यानंतर अद्याप त्याला भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही.

पंड्याने भारताकडून एकूण ११ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३१.२९ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच गोलंदाजी करताना त्याने १७ विकेट्सही घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

तीच गर्दी, तोच आवाज…! प्रेक्षकांच्या आगमनासाठी बीसीसीआय आतुर, शेअर केला भावनिक व्हिडिओ

भारत आणि इंग्लंड संघात आज होणार काट्याची टक्कर, अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना; पराभवाचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---