---Advertisement---

बीसीसीआय अध्यक्ष बनताच रॉजर बिन्नींचे गांगुलीबद्दल मोठे विधान; म्हणाले, ‘त्याने भारतीय क्रिकेटचा…’

On: शुक्रवार, ऑक्टोबर 21, 2022 3:00 PM
Sourav-Ganguly-And-Roger-Binny
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या नवीन अध्यक्षपदी भारतीय संघाचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी विराजमान झाले आहेत. त्यांनी सौरव गांगुली यांची जागा घेतली असून तेच बीसीसीआयचा मोर्चा सांभाळणार आहेत. बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर बिन्नी यांनी माजी अध्यक्ष गांगुलींबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गांगुलींचे कौतुक केले आहे. ते म्हणालेत की, गांगुलीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला आहे.

बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष
रॉजर बिन्नी (Roger Binny) हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष आहेत. त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात कोणीही निवडणुकीला उभे राहिले नाही. त्यांच्यापूर्वी सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी तब्बल 3 वर्षे बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले. गांगुलीने बिन्नी यांनी अध्यक्षपद भूषवल्यानंतर शुभेच्छाही दिल्या. त्यांनी म्हटले की, बोर्ड चांगल्या लोकांच्या हातात आहे.

‘गांगुलीने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला’
आता रॉजर बिन्नी यांनीही गांगुलींची प्रशंसा केली आहे. त्यांनी म्हटले की, “सौरव गांगुली हे एक खूप मोठे नाव आहे. ते एक असे व्यक्ती आहेत, ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. ते जेव्हा भारतीय संघाचे कर्णधार होते, तेव्हा ते खेळाडूंमध्ये भांडण लावून त्यांच्याकडून चांगले काम करून घ्यायचे. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने खूप सामने जिंकले आहेत. फक्त 2003च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामना पराभूत होणे, हे भारतासाठी दुर्दैवी होते.”

गांगुली आणि बिन्नींचे क्रिकेटमधील योगदान मोलाचे
विशेष म्हणजे, सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. बिन्नी यांनी भारतीय संघाला 1983च्या विश्वचषकात विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच, गांगुलींच्या नेतृत्वात भारतीय संघ 2003च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात पोहोचला होता. याव्यतिरिक्त ते भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारही आहेत. आधी गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष होते आणि आता त्यांच्या जागी रॉजर बिन्नी अध्यक्ष आहेत. दोन्ही दिग्गज माजी खेळाडूंनी एकमेकांच प्रशंसा केली आहे आणि यावरून समजते की, त्यांच्यातील बाँड किती चांगला आहे.

आता रॉजर बिन्नी त्यांच्या कार्यकाळात बीसीसीआयचा चेहरामोहरा कशाप्रकारे बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआय अन् पीसीबीमधील वाद मिटवण्याचा दम आयसीसीमध्ये आहे का? वाचा एका क्लिकवर

टी20 दिग्गजांच्या पंक्तीत बसला आयर्लंडचा हिरो पॉल स्टर्लिंग; देशाचीही उंचावली मान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---