---Advertisement---

विराट कोहलीच्या आहाराबद्दल नवा वाद – विराट कोहलीने केला शाकाहारी असण्याचा खोटा दावा?

On: गुरूवार, फेब्रुवारी 20, 2025 9:19 PM
---Advertisement---

जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंमध्ये विराट कोहलीची मोजणी केली जाते. विराट कोहली असा दावा करतो की, तो शाकाहारी बनल्यानंतरच त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे. यादरम्यानच विराट कोहलीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मधून असे समजले जात आहे की, विराट कोहली अजूनही मांसाहारचे सेवन करत आहेत.

2018 मध्ये विराट कोहलीने खुलासा केला होता की, 2018 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी सामना खेळत असताना त्याला तब्येतीशी संबंधित समस्या जाणवू लागल्या. डॉक्टरांनी त्याला असा सल्ला दिला होता की त्याने मांसाहार बंद करावे व विराटने त्याचे पालन देखील केले. यानंतर शाकाहारी डाएटचे सेवन करून त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे.

विराट कोहलीने शाकाहारी असल्याचा दावा केल्यानंतर हा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आता विराट कोहलीला ट्रोल केले जात आहे. एका व्यक्तीने असे लिहिले आहे की, असे करण्यासाठी विराट कोहलीला तुरुंगात जायला हवे. तर दुसऱ्या व्यक्तीने असे दावा केला आहे की त्याने स्वतः विराट कोहलीला मांस खाताना पाहिले आहे. इंटरनेटवरती उपलब्ध असलेल्या माहिती प्रमाणे विराट कोहली ब्ल्यू ट्राईब या कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी या कंपनी मध्ये पैसे गुंतविले आहेत. या करणामुळे देखील विराटला ट्रोल केले जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या : 

200 वनडे आणि आयपीएल सामन्यांचा ऐतिहासिक टप्पा पार करणारे 5 भारतीय खेळाडू

पाकिस्तानला आयसीसीचा दणका, स्लो ओव्हर रेटसाठी केला दंड

“गूगलचा सिनेमॅटिक टच! जया बच्चन यांच्या डायलॉगसोबत दिला भारतीय संघाला पाठिंबा”

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---