---Advertisement---

चीनमध्ये आला नवा जीव घेणा व्हायरस, हरभजन सिंग घेतला चायनाचा असा समाचार

On: बुधवार, जुलै 1, 2020 2:29 PM
---Advertisement---

मुंबई । चीनमधून आलेल्या कोरोना या महाभयानक विषाणूने संपूर्ण जगाला मेटाकुटीला आणले आहे. अनेक लोकांना या विषाणूमुळे नाहक जीव गमवावा लागला. कोरोना विरुद्धची लढाई सुरू असताना आता नवा आणखी एक व्हायरस चीनमधून आला आहे. हा व्हायरस डुकरांपासून आला आहे. ही बातमी येताच भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्विटरद्वारे चीनवर राग व्यक्त केला आहे.

हरभजन सिंगने बुधवारी चीनवर आणखी एक व्हायरस तयार करण्याचा आरोप लावला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, “संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने तंग करुन सोडले असताना चीनने आणखी अनेक व्हायरस तयार केला आहे. हरभजन यासोबतच एक राग व्यक्त करणारा इमोजी देखील शेअर केला आहे.”

चीनने गलवान घाटीत आक्रमण केल्यानंतरही हरभजन सिंगने ट्विटरच्या माध्यमातून चीनचा खरपूस समाचार घेत ट्विटरवर लिहिले की, “आता आम्हाला आत्मनिर्भर व्हायचा असेल. चीनी वस्तूवर बहिष्कृत करणं योग्य ठरेल. प्रत्येक वस्तू भारतात बनवू शकतो. आमच्यात खूप काही क्षमता आहेत. आपल्या देशावर जर चीनचे सैन्य आक्रमण करत असेल तर त्यांच्या उत्पादनावर बंदी घालायला हवी. आमच्या पैशावर चीन का चालावे.”

“चिनी स्पॉन्सर नसले तरी अनेक भारतीय कंपन्या पुढे येतील. आयपीएल खूप मोठा ब्रँड आहे. आयपीएलला इतर कोणत्याही ब्रँडची गरज नाही,”असे हरभजन सिंगने सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---