मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अजून एका मिस्ट्री स्पिनरची एन्ट्री झालेली आहे. दुखापतीच्या कारणाने विघ्नेश पुथुर आयपीएल 2025 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मुंबई संघाने त्यांच्या संघात रघु शर्माला स्थान दिले आहे. मुंबई संघाचं प्रदर्शन मागच्या सामन्यांमध्ये कमालीच राहिलं आहे. मुंबईने सलग 5 सामने जिंकले आहेत. मागच्या सामन्यात मुंबईने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा 54 धावांनी शानदार पराभव केला होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने मागच्या सामन्यांमध्ये सातत्याने शानदार प्रदर्शन केलं आहे.
आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्याच्या गोलंदाजीने प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारा गोलंदाज विघ्नेश पुथुर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्सने विघ्नेशच्या जागी नव्या खेळाडूची घोषणा केली आहे. विघ्नेशच्या जागी रघु शर्माला संघात संधी देण्यात आली आहे. 11 मार्च 1993 रोजी पंजाबच्या जालंदरमध्ये जन्मलेला रघु डाव्या हाताचा लेग ब्रेक गोलंदाज आहे.
घरेलू क्रिकेटमध्ये तो पंजाब आणि पुड्डुचेरीसाठी खेळलेला आहे. रघुने आतापर्यंत खेळलेल्या 11 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 19.19 च्या सरासरीने 57 विकेट्स घेतलेल्या आहेत. यादरम्यान त्याने 56 धावा देऊन 7 विकेट्स घेणे ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. लिस्ट- ए क्रिकेटमध्ये रघुने 9 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. 3 टी 20 सामन्यात त्याने 3 विकेट्स घेतलेल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 स्पर्धेची सुरुवात 4 पराभवांनी होती. नंतर हंगामात चार पराभवांचा सामना करून मुंबईने त्यांचा हरवलेला फॉर्म परत आणला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने मागच्या 5 सामन्यांमध्ये सलग विजय मिळवला आहे. फलंदाजीमध्ये रियान रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव सातत्याने चांगली फलंदाजी करत आहेत. तसेच रोहित शर्मा सुद्धा फॉर्ममध्ये आला आहे. गोलंदाजीमध्ये बुम-बुम बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्यासोबत दीपक चाहर सुद्धा विरोधी फलंदाजांना घाम फोडत आहेत.





