---Advertisement---

आयपीएलच्या झगमगाटात नवी कसोटी क्रमवारी जाहीर; रोहित-विराट-बुमराहला…

On: गुरूवार, मे 26, 2022 2:51 PM
Virat-Kohli-Rohit-Sharma
---Advertisement---

जगभरात इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2022) चर्चा असताना, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच नवी कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. खेळाडूंच्या वैयक्तिक क्रमवारीत काही प्रमाणात बदल झाले आहेत.‌ त्याचवेळी, भारतीय क्रिकेटपटूंना या नव्या क्रमवारीत फायदा झालेला दिसून येतो. श्रीलंका आणि बांगलादेश (BANvSL) यांच्यातील कसोटी मालिकेनंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

रोहित-विराट क्रमवारीत जैसे थे

फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली यांच्या क्रमवारीत काहीही बदल झाला नाही. ते अनुक्रमे आठव्या व दहाव्या स्थानी कायम आहेत. ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लॅब्युशेन याने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. श्रीलंकेविरुद्ध शानदार कामगिरी करणारा बांगलादेशचा विकेटकिपर लिटन दास तीन स्थानांच्या फायद्यासह १७ व्या क्रमांकावर पोहोचला. तर, या सामन्यात १९९ धावांची खेळी करणारा श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज २१ व्या स्थानी आला आहे. बांगलादेशचे अनुभवी फलंदाज मुशफिकूर रहिम व तमिम इक्बाल यांनादेखील त्यांच्या शतकी खेळ्यांचे बक्षीस मिळाले. रहीम २५ व्या आणि तमिम २७ क्रमांकावर विराजमान आहे.

अश्विन दुसऱ्या स्थानी कायम

गोलंदाजांच्या क्रमवारीतही फारसा बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स हा, भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला ५१ गुणांनी पछाडत पहिल्या स्थानी कायम आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिसरे स्थान काबीज केलेय. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याचेदेखील कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील पहिले स्थान अबाधित आहे. तर, श्रीलंकेविरुद्ध ४ बळी मिळवणारा बांगलादेश शाकिब अल हसन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत २९ व्या स्थानी आला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोहलीचा ‘विराट’ विक्रम, २५ धावांची छोटेखानी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या धाकड फलंदाजाला पछाडले 

क्या मस्त खेला रे तू! विराटच्या नेत्रदिपक चौकाराचं गांगुली, जय शहाकडून कौतुक, रिऍक्शन कॅमेरात कैद 

Video: खुद्द कर्णधारानेच केली निराशा! राहुलने झेल सोडताच जल्लोष करत असलेल्या गंभीरने धरलं डोक 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---