वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील साखळी केल्यानंतर आता उपांत्य सामने खेळले जाणार आहेत. तत्पूर्वी, बुधवारी (14 नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवी वनडे क्रमवारी जाहीर केली. फलंदाजी व गोलंदाजांच्या या क्रमवारीत काही बदल झालेले दिसले. विशेष म्हणजे गोलंदाजी व फलंदाजीच्या या क्रमवारीत पहिल्या पाच मध्ये प्रत्येकी तीन भारतीय आहेत.
https://twitter.com/ICC/status/1724430772394725576?t=3-cViMclJdTGwj17-oMKBA&s=19
आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत शुबमन गिल याने आपले पहिले स्थान अबाधित राखले. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा देखील दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. भारताच्या विराट कोहली याला मागे टाकत दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक याने तिसरे स्थान काबीज केले. तर, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर भारताचेच विराट कोहली व रोहित शर्मा हे आहेत.
गोलंदाजांच्या क्रमवारीतही भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसून येतो. भारताच्या मोहम्मद सिराज याला मागे टाकून दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याने पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर सिराज तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ऍडम झम्पा दिसून येईल. प्रत्येकी दोन स्थानांच्या प्रगतीसह भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव चौथ्या तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर आहे. तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा पहिल्या दहामधून बाहेर पडत बाराव्या क्रमांकावर पोहोचला.
अष्टपैलूंच्या क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा हा एकमेव पहिल्या दहामध्ये दिसून येतो. तो या क्रमवारीत दहाव्या स्थानी आहे.
(New ODI Batting And Bowling Rankings Update 3 Indian Batters And Bowlers In Top 5)
हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान