---Advertisement---

IND vs AFG: धोनी-गांगुलीला मागे टाकण्याची शुबमन गिलकडे संधी! कर्णधार म्हणून आतापर्यंत झळकावली 5 शतके

On: शुक्रवार, जून 5, 2026 10:07 PM
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg) यांच्यात 6 जूनपासून न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडियमवर एकदिवसीय कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियात काही नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, परंतु सर्वांचे लक्ष कर्णधार शुबमन गिलवर (Shubman gill) असेल. जेव्हापासून गिलने कसोटीत कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे, तेव्हापासून त्याची फलंदाजी सुधारली आहे. 2025 च्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे गिलला दोनही सामने खेळता आले नव्हते, मात्र आता अफगाणिस्तानविरुद्धच्या या कसोटी सामन्यात त्याच्याकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो एमएस धोनी आणि सौरव गांगुली यांना मागे टाकू शकतो.

शुबमन गिलने 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यातून कसोटीत कर्णधारपदाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने आतापर्यंत 8 सामन्यांच्या 14 डावांत फलंदाजी करताना 79.16 च्या सरासरीने 950 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.

सध्या कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत गिल संयुक्तपणे 5 व्या क्रमांकावर आहे. तसेच, त्याच्यासोबत धोनी, गांगुली आणि नवाब पतौडी आहेत. जर गिलने अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात शतक झळकावले, तर तो या दिग्गजांना मागे टाकेल. कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, ज्याने 20 शतके झळकावली आहेत.

कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय

विराट कोहली: 20 शतके (68 सामने)
सुनील गावस्कर: 11 शतके (47 सामने)
मोहम्मद अझहरुद्दीन: 9 शतके (47 सामने)
सचिन तेंडुलकर: 7 शतके (25 सामने)
एमएस धोनी, सौरव गांगुली, नवाब पतौडी आणि शुबमन गिल: प्रत्येकी 5 शतके

अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात शुबमन गिलकडे आपल्या कसोटी कारकिर्दीतील 3 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी त्याला केवळ 157 धावांची गरज आहे. जर गिलने हा टप्पा गाठला, तर तो ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या इतिहासात 3 हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल. आतापर्यंत त्याने 40 कसोटी सामन्यांत 43.07 च्या सरासरीने 2843 धावा केल्या आहेत, ज्यात 10 शतके आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---