---Advertisement---

IND vs ENG: 4 वर्षांनंतर इंग्लंड संघात परतला 152 किमी वेगाचा गोलंदाज, भारतासमोर मोठं आव्हान!

On: गुरूवार, जून 26, 2025 8:17 PM
---Advertisement---

इंग्लंडने भारताविरुद्ध 2 जुलैपासून एजबेस्टनमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्यांच्या संघाची घोषणा केलेली आहे. मोठ्या काळानंतर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. आर्चर मागच्या काही वर्षांपासून हाताच्या दुखापती कारणाने संघाबाहेर होता आणि त्याने शेवटचा फेब्रुवारी 2021 मध्ये अहमदाबाद येथे भारताविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. (Jofra Archer Return England team for 2nd Test vs IND)

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांनी एक अधिकृत वक्तव्य करत म्हटले आहे की, 30 वर्षीय जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात सामील करण्यात आले आहे. जर त्याला एजबेस्टन कसोटीमध्ये संधी मिळाली तर, तो त्याच्या कसोटी क्रिकेट करिअरचा 14 वा सामना खेळेल.

भारताविरुद्ध लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 5 विकेट्सने विजय मिळवला आणि 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतलेली आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघ:
बेन स्टोक्स (कर्णधार), ओली पोप (उपकर्णधार), जो रूट, हैरी ब्रूक, बेन डकेट, जैक क्रॉली, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), सैम कुक, जैकब बेथेल, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, ब्रायडन कार्स, जेमी ओवरटन, जोश टंग आणि क्रिस वोक्स.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---