येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. परंतु, हा दौरा सुरू होण्यापूर्वीच अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ ९ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्यानंतर १७ डिसेंबर पासून कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. परंतु, गुरुवारी (२ डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने चिंता आणखी वाढली आहे. आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डने मोठे वक्तव्य केले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्यानंतर ११ जानेवारी पासून ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. तसेच १९ जानेवारी पासून चार टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डने याबाबत विधान करत म्हटले की, “क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने पुष्टी केली आहे की, देशांतर्गत क्रिकेटमधील डिव्हिजन टू सीएसए चौथ्या फेरीतील सर्व तीन सामने, जे २ ते ५ डिसेंबर दरम्यान होणार होते, ते पुढे ढकलण्यात आले आहेत.”
तसेच त्यांनी पुढे म्हटले की, “ही स्पर्धा बायो बबलचा वापर करून खेळवली जात नव्हती. त्यामुळे काही खेळाडूंचे कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आले होते. या स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्वांचे आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी संस्थेच्या कोविड -१९ खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणी करणे हे दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे प्रथम प्राधान्य आहे.”
जर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला, तर या दौऱ्यावर कडक बायो बबलचा वापर केला जाईल. याबाबत बोलताना दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डने म्हटले की, “सीएसए या स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. वेळ आल्यास, वर्षभरातील इतर सामन्यांबाबत देखील निर्णय घेतला जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
INDvNZ: दुसर्या कसोटी सामन्यातील भारताच्या ‘या’ शिलेदाराबद्दल माहितीये का? पराक्रम वाचून शॉक व्हाल
सीएसके संघ आयपीएल मेगा लिलावात सर्वात आधी खरेदी करणार ‘हा’ खेळाडू?






