बांगलादेशातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कांउसिलने (आयसीसी, ICC) आता मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने आगामी महिला टी20 विश्वचषक 2024 चे (Women’s T20 World Cup 2024) ठिकाण बदलले आहे. आता ही स्पर्धा बांगलादेशऐवजी यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेतील सामने आता दुबई आणि शारजाह येथे होतील.
आयसीसीने मंगळवारी (20 ऑगस्ट) हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, ‘महिला टी20 विश्वचषक स्पर्धेचा नववा हंगाम आता संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार आहे. दुसरीकडे बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडेही (BCB) या स्पर्धेचे यजमानपद राहील. ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान युएईमधील दुबई आणि शारजाह या दोन ठिकाणी होणार आहे.’
“बांग्लादेशमध्ये महिला टी20 विश्वचषकाचे आयोजन न करणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) अतिशय शानदार आयोजन करत स्पर्धेला संस्मरणीय बनवले असते,” असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस यांनी निवेदनात म्हटले आहे.
ज्योफ अल्लार्डिस पुढे म्हणाले, “टी20 विश्वचषक स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यासाठी सर्व मार्ग शोधून काढल्याबद्दल मी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या संघाचे आभार मानू इच्छितो. जरी महिला विश्वचषकाचे सामने आता युएईत खेळवले जाणार असले तरीही, बांगलादेशकडे यजमानपदाचे अधिकार कायम राहतील. आम्ही भविष्यात बांगलादेशात इतर आयसीसी जागतिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहोत.”
भारतीय महिला क्रिकेट संघाचे टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक
भारत विरुद्ध न्यूझीलंड: 5 ऑक्टोबर
भारत विरुद्ध पाकिस्तान : 7 ऑक्टोबर
भारत विरुद्ध श्रीलंका: 10 ऑक्टोबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: 14 ऑक्टोबर
महत्त्वाच्या बातम्या-
‘इशान किशनला टीम इंडियात जागा नाही’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं वादग्रस्त विधान
विनेश फोगटची नवी इनिंग! कुस्ती सोडल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार?
दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत फोटो घेण्यासाठी खूप इच्छुक ‘ही’ महिला खेळाडू