---Advertisement---

न्यूझीलंडच्या धडाकेबाज फलंदाजानं घेतली आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भारताविरुद्ध टी20 मध्ये ठोकलं होतं शतक

---Advertisement---

न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज कॉलिन मुनरो यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मुनरोनं न्यूझीलंडसाठी 3000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तो त्याच्या टी20 क्रिकेटमधील धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो.

कॉलिन मुनरोनं टीम इंडियाविरुद्ध टी20 मध्ये शतक झळकावलं आहे. राजकोटमध्ये हा सामना खेळला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांसह देशांतर्गत क्रिकेटमध्येही मुनरोचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं मुनरोच्या निवृत्तीची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. बोर्डानं ‘X’ वर लिहिलं की, “कॉलिन मुनरो यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.” मुनरोनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 123 सामने खेळले आहेत. त्यानं 2013 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तो जून 2019 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. मुनरोनं 2012 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर शेवटचा सामना भारताविरुद्ध फेब्रुवारी 2020 मध्ये खेळला होता.

कॉलिन मुनरोनं टीम इंडियाविरुद्ध ठोकलेलं शतक चाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिका खेळली गेली होती. मालिकेचा दुसरा सामना राजकोट येथे झाला. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या. या सामन्यात मुनरोनं 58 चेंडूत नाबाद 109 धावा केल्या होत्या. आपल्या या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 7 षटकार मारले होते. न्यूझीलंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला केवळ 156 धावा करता आल्या. या सामन्यात टीम इंडियाचा 40 धावांनी पराभव झाला होता.

कॉलिन मुनरो यानं न्यूझीलंडसाठी 65 टी20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यानं 1724 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्यानं 3 शतकं आणि 11 अर्धशतकं ठोकली आहेत. मुनरोनं 57 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1271 धावा केल्या आहेत. यात 8 अर्धशतकांचा समावेश आहेत. कॉलिन मुनरो यानं न्यूझीलंडसाठी एक कसोटी सामनाही खेळला आहे.

फलंदाजीसह पार्ट टाईम गोलंदाजी करणाऱ्या मुनरोनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्यानं 4 विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलच्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “हा नियम…”

कर्णधार बदलाच्या चर्चांवर लखनऊच्या मॅनेजमेंटकडून स्पष्टीकरण, केएल राहुलकडेच असणार संघाचं नेतृत्व

आरसीबीसाठी अजूनही अवघड आहे प्लेऑफचा रस्ता, जाणून घ्या विराट कोहलीची टीम कशाप्रकारे होऊ शकते क्वालिफाय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---