क्रिकेटविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडचे माजी कर्णधार बॅरी सिनक्लेअर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी १० जुलै रोजी निधन झाले. त्यांनी न्यूझीलंडकडून २१ कसोटीत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध शतकी खेळी करताना ११४८ धावा केल्या होत्या. त्यांनी २१ पैकी ३ सामन्यांत नेतृत्त्वही केले.
सिनक्लेअर कसोटीत १००० धावा पूर्ण करणारे तिसरे फलंदाज होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ११८ प्रथम श्रेणी क्रिकेट सामनेही खेळले. यामध्ये त्यांनी ६ शतके आणि ३८ अर्धशतकांसह ६११४ धावा केल्या. तसेच ५ अ दर्जाच्या सामन्यांमध्ये ११८ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
(ही बातमी ८० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)