---Advertisement---

NZ VS ENG; शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा मोठा विजय, पण मालिका इंग्लंडच्या खिश्यात

On: मंगळवार, डिसेंबर 17, 2024 11:12 AM
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा समारोप झाला आहे. यजमान न्यूझीलंडने मालिकेतील शेवटचा सामना 423 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. मात्र, इंग्लंडने या मालिकेवर आधीच कब्जा केला आहे. कारण पहिले दोन सामने इंग्लंडने जिंकले होते. अशा प्रकारे ही मालिका इंग्लंडने 2-1 ने जिंकली. हा सामना टीम साऊथीचा शेवटचा कसोटी सामना होता. या सामन्यात त्याने 2 बळी घेतले. न्यूझीलंडने दुसऱ्यांदा कसोटी सामना 423 धावांनी जिंकला आहे. धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा हा सर्वात मोठा संयुक्त विजय आहे. या मालिकेतील उत्तम कामगिरीसाठी हॅरी ब्रूकला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. तर मिचेल सँटनरला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. अशा स्थितीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 347 धावा केल्या होत्या ज्यात मिचेल सँटनरच्या 76 धावा, टॉम लॅथमच्या 63 धावा आणि केन विल्यमसनच्या 44 धावांचा समावेश होता. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्सने 4 बळी घेतले. यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात खेळताना केवळ 143 धावा केल्या. तर गोलंदाजीत मॅट हेन्रीने 4 तर विल ओ’रुर्क आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. या डावात एकाही इंग्लिश खेळाडूला 40 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. 204 धावांची आघाडी असतानाही न्यूझीलंडने इंग्लंडला फॉलोऑनही दिला नाही.

न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. केन विल्यमसनने दमदार शतक झळकावले. तो 156 धावा करून बाद झाला. विल यंग आणि डॅरिल मिशेल यांनी 60-60 धावा केल्या. खालच्या क्रमाकात सँटनरने 49 धावा केल्या तर रचिन रवींद्र आणि टॉम ब्लंडेल यांनी प्रत्येकी 44 धावांची खेळी केली. या डावात न्यूझीलंडने एकूण 453 धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंडसमोर 658 धावांचे मोठे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ 234 धावा करून गडगडला. अशाप्रकारे किवी संघाने 423 धावांच्या फरकाने विजय मिळवला. इंग्लंडकडून या डावात जेकब बेथेलने 76 धावा केल्या आणि जो रूट 54 धावा करण्यात यशस्वी ठरला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने 4 बळी घेतले.

हेही वाचा-

रिंकू सिंगची कर्णधारपदी नियुक्ती, या प्रमुख स्पर्धेमध्ये संघाचे नेतृत्व करणार
3 कारणे ज्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरणार
गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी संघाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज रुग्णालयात दाखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---