---Advertisement---

विल यंगच्या वादळापुढे श्रीलंकन गोलंदाजांनी टाकल्या नांग्या, न्यूझीलंडने वनडे मालिका 2-0ने घातली खिशात

Will-Young-And-Henry-Nicholls
---Advertisement---

श्रीलंका संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. आतापर्यंत श्रीलंकेसाठी हा दौरा खूपच खराब गेला आहे. या दौऱ्यात पार पडलेल्या 2 कसोटी आणि 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेला सपाटून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आधी कसोटी मालिकेत क्लीन स्वीप मिळाला. त्यानंतर वनडे मालिकाही 0-2ने गमवावी लागली. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघातील वनडे मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी (दि. 31 मार्च) हॅमिल्टन येथे पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचा हिरो विल यंग ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, हेन्री शिप्ले याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (New Zealand vs Sri Lanka) संघातील नाणेफेक पाहुण्या संघाने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी श्रीलंकेने फलंदाजी करताना 41.3 षटकात 10 विकेट्स गमावत 157 धावा केल्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंड संघाने 32.5 षटकात 4 विकेट्स गमावत 159 धावा करत पूर्ण केले. अशाप्रकारे न्यूझीलंडने 6 विकेट्सने विजय (New Zealand Won By 6 Wickets) मिळवला आणि मालिकाही 2-0ने खिशात घातली.

https://twitter.com/ICC/status/1641701219713286146

न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना विल यंग याने चमकदार कामगिरी केली. त्याने यावेळी श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देत नाबाद 86 धावा केल्या. या धावा करताना त्याने 11 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त हेन्री निकोल्स यानेही नाबाद 44 धावांचे योगदान दिले. त्यात 5 चौकारांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त एकालाही 2 आकडी धावसंख्या गाठता आली नाही. मात्र, विल आणि हेन्रीच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने सामना जिंकला.

यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना लहिरू कुमारा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कसुन रजिथा आणि कर्णधार दसून शनाका यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेकडून पथुम निसांका याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 64 चेंडूत 57 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 8 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त दसून शनाका याने 31 धावा आणि चमिका करुणारत्ने याने 24 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त सहा फलंदाजांना 10 धावांचा आकडा पार करता आला नाही आणि 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना तीन गोलंदाजांनी प्रत्येकी 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यात मॅट हेन्री, हेन्री शिप्ले आणि डॅरिल मिचेल या गोलंदाजांचा समावेश होता.

स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंडने 198 धावांच्या अंतराने जिंकला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडू न खेळता सामना अनिर्णित ठरला होता. आता दौऱ्यातील टी20 मालिकेला 2 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. (new zealand beat sri lanka team in 3rd odi by 6 wickets and won series with 2-0 margin)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय मूळ असलेल्या पठ्ठ्याची धमाल! कमी वयात यूएईविरुद्ध ठोकले शतक, वाचवली अमेरिकेची लाज
आयपीएलचा किताब न जिंकणारे 4 संघ, 2 नवीन कर्णधारासोबत उतरणार मैदानात, यावेळी फळफळणार का नशीब?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---