न्यूझीलंडने दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला एक डाव आणि १२ धावांनी पराभूत करत मालिका खिशात घातली आहे. या वियाजमुळे न्यूझीलंड संघ ११६ गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आला आहे, तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम आहे.
चौथ्या दिवसाचा थोडक्यात आढावा
वेस्ट इंडिजने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी (१४ डिसेंबर) ६ बाद २४४ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या डावात ३२९ धावांनी पिछाडीवर असल्यामुळे फॉलोऑन खेळताना वेस्ट इंडिजला विजयासाठी ८५ धावांची आवश्यकता होती. मात्र, वेस्ट इंडिजचा संघ ३१७ धावांवरच सर्वबाद झाला. न्यूझीलंड संघातील गोलंदाजांच्या एकत्रित कामगिरीमुळे निकाल त्यांच्या बाजूने लागला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना दुसऱ्या डावात जास्त धावा करु दिल्या नाहीत.
पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास थोडा उशीर झाला. पण न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरची लवकरच दांडी गुल केली. त्यामुळे होल्डर ६१ धावा करत पव्हेलियनला परतला. त्यानंतर अल्जारी जोसेफने २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २४ धावा केल्या. पण साऊदीने बी जे वॉटलिंगच्या हातून त्याला झेलबाद केले. पुढे जोशुआ डी सिल्वा आणि शॅनन गॅब्रिएल यांनीही लवकरच आपल्या विकेट गमावल्या. त्यामुळे केवळ सामनाच नव्हे, तर मालिकाही न्यूझीलंडच्या नावावर झाली.
टीम साऊदी मोठ्या विक्रमाच्या जवळ
महत्त्वाचे म्हणजे, साउथीने या सामन्यात एकूण ७ विकेट्स घेतल्या. यासह त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २९६ विकेट्स पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे तो लवकरच न्यूझीलंडकडून कसोटीतील ३०० विकेट्स पूर्ण करणारा तिसरा गोलंदाज बनेल. रिचर्ड हेडली आणि डॅनियल व्हिटोरी यांनी हा पराक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“इतर संघात कोण आहे कोण नाही, हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संघाबद्दल चर्चा करा”
मैदानात पुन्हा येणार ‘हिटमॅन’चं वादळ! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होणार आज रवाना
काय सांगता! आजच्या दिवशी झाला होता कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना ‘टाय’
ट्रेंडिंग लेख-