श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मिचेल सँटनर नियमित कर्णधार म्हणून प्रथमच मर्यादित फाॅरमॅटच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात दोन नवीन खेळाडूंचा प्रवेश झाला आहे. विशेषतः टी20 संघात. ऑकलंडचा फलंदाज बीवन जेकब्सची पहिल्यांदाच टी20 मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. शनिवार 28 डिसेंबरपासून या मालिकेसा सुरूवात होणार आहे.
22 वर्षीय बेवन जेकब्सने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. ज्याच्या जोरावर त्याला आयपीएल 2025 मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने विकत घेतले. यावेळी न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनरही मुंबईकडून खेळणार आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी 13 सदस्यीय संघाची निवड केली आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे या मालिकेसाठी माजी कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीवीर डेवाॅन काॅनव्हे उपल्बध असणार नाहीत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी न्यूझीलंडसाठी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका ही शेवटची एकदिवसीय मालिका आहे.
न्यूझीलंड टी20 संघ
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फॉक्स, मिच हे, मॅट हेन्री, बीवन जेकब्स, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, नॅथन स्मिथ
न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, मिच हे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओ’रुर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, विल यंग
ICYMI | Our T20I and ODI squads for the upcoming KFC T20I and Chemist Warehouse ODI series’ against @OfficialSLC 🏏 #SLvNZ pic.twitter.com/K5UqBLaRbm
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 22, 2024
हेही वाचा-
SA vs PAK; स्टेडियममध्ये मुलाचा जन्म झाला, प्रेम ही व्यक्त झाले, क्रिकेट फॅन्ससाठी सामना संस्मरणीय ठरला
INDW vs WIW; हरमनप्रीत कौरने एका हाताने घेतला आश्चर्यकारक झेल, पाहा VIDEO
पाकिस्तानचा ऐतिहासिक विक्रम, दक्षिण आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ