कोणत्याही क्रिकेटपटूसाठी त्याचे शरिर आणि फिटनेस फार महत्त्वाचे असते. पण जेव्हा त्याला एखाद्या मोठ्या आजाराची लागण होते तेव्हा त्याच्यासमोर मोठे संकट उभे राहाते. असेच न्यूझीलंडच्या एका २६ वर्षीय वेगवान गोलंदाजाबाबत झाले आहे. अँड्र्यू हेझलडीन असे त्या गोलंदाजाचे नाव असून त्याला कर्करोग झाला आहे. त्यामुळे आता त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेझलडीन कँटरबरीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याला सप्टेंबरमध्ये हॉजकिन लिम्फोमा या प्रकारचा कर्करोग असल्याचे निदान झाले. या कर्करोगामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. या कर्करोगाचे इंफेक्शन जसे वाढत जाते तशी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे ताप येणे, रात्री घाम फुटणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. पण सुदैवाने हेझलडीनच्या कर्करोगाचे निदान लवकर झाले असल्याने तो बरा होण्याच्या शक्यता अधिक आहेत.
कँटरबरी क्रिकेटचे हाय परफॉर्मन्स मॅनेजर मार्टि क्रोय म्हणाले की ‘नक्कीच ही अँड्र्यू साठी वाईट बातमी आहे. आम्ही या कठीण परिस्थितीत त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या बरोबर आहोत. आम्ही त्याच्या उपचारादरम्यान नेहमीच पाठीशी उभे राहू. आशा आहे की तो लवकरण पूर्ण तंदुरुस्त होऊन पुढच्या वर्षी खेळायला येईल.
हेझलडीनने २०१८ मध्ये कँटरबरीकडून पदार्पण केले होते. त्याने १४ प्रथम श्रेणी सामने आत्तापर्यंत खेळले असून ३५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने १६ अ दर्जाच्या सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या आहेत. आता या हंगामासाठी त्याच्याऐवजी कँटरबरी संघात जॅक्सन लॅथमचा समावेश झाला आहे.
मिळालेल्या संधीबद्दल लॅथम म्हणाला, ‘ही खूप कठीण परिस्थिती आहे. पण मला मिळालेल्या संधीबद्दल मी आनंद आहे आणि मी माझे संपूर्ण लक्ष माझ्या क्रिकेटवर केंद्रीत करेल.’
महत्त्वाच्या बातम्या –
Video : “आता तुझ्याकडून बॅट घ्यावी लागेल”, सूर्यकुमारने ‘त्या’ व्हिडीओमुळे चहलला केले ट्रोल
“तो मिलियन डॉलरचा खेळाडू”, आर अश्विनने उधळली पाकिस्तानच्या क्रिकेपटूवर स्तुतीसुमने
‘हे’ खेळाडू ठरवतील भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल, भारताच्या दिग्गजाची भविष्यवाणी