न्यूझीलंड संघाचा युवा खेळाडू रचिन रवींद्र विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावत आहे. गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) न्यूझीलंडने श्रीलंकेला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या विजयात रचिनने 34 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावांचे योगदान दिले. सामना जिंकल्यानंतर रचिनने बंगळुरूत आपल्या आजी-आजोबांना भेटला. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रचिन रवींद्र (Rachin Ravindra) बंगळुरूत आपल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी पोहोचला. तेव्हा आपला नातू घरी आल्याच्या आनंदात आजीने सर्वप्रथम रचिनची दृष्ट काढली. आता यादरम्यानचा रचिन आणि त्याच्या आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. त्यामुळे या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत.
Grandparents are ❤️
Rachin Ravindra getting all the love at grandparents home in Bengaluru. pic.twitter.com/ZDhTpDeYST
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 10, 2023
खरं तर, न्यूझीलंड संघाला आपले अखेरचे दोन सामने बंगळुरूतच खेळायचे होते. यातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध, तर दुसरा सामना श्रीलंकेविरुद्ध होता. यासाठी रचिन आपल्या संघासोबत बंगळुरूत होता. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअम (M Chinnaswamy Stadium) येथे रचिनने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतकही झळकावले होते. त्याने 94 चेंडूंचा सामना करताना 108 धावांची शतकी खेळी केली होती. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश होता.
या सामन्यासाठी रचिनचे आजी-आजोबा (Rachin’s grandparents) स्टेडिअममध्ये उपस्थित होते. रचिनचे आजी-आजोबा प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आहे. त्याच्या आजोबांचे नाव बाळकृष्ण अडिगा, तर आजीचे नाव पूर्णिमा अडिगा असे आहे. दोघेही दक्षिण बंगळुरूत राहतात.
रचिनचे बंगळुरूशी घनिष्ठ नाते आहे. त्याचे वडील 90च्या दशकात न्यूझीलंडला शिफ्ट झाले होते. रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. ते स्वत:ही बंगळुरूत क्लब क्रिकेट खेळायचे. त्यामुळेच, जेव्हा रचिनचा जन्म झाला, तेव्हा त्यांनी राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या नावावरून आपल्या मुलाचे नाव रचिन ठेवले.
पदार्पणाच्या विश्वचषकात रचला इतिहास
रचिन रवींद्र याच्यासाठी आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा खूपच शानदार राहिली आहे. त्याने आपल्या संघासाठी आतापर्यंत 9 सामन्यात 70.62च्या सरासरीने 565 धावा केल्या आहेत. तो पदार्पणाच्या विश्वचषकातच सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. रचिनने याबाबतीत इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोचा विक्रम मोडला आहे. त्याने 2019 विश्वचषकात 532 धावा केल्या होत्या.
उपांत्य सामन्यात भारताशी टक्कर
न्यूझीलंड क्रिकेट संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जवळपास जागा पक्की केली आहे. अशात पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा सामना भारताविरुद्ध होईल. दोन्ही संघ उपांत्य सामन्यात 15 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडिअम येथे भिडतील. या सामन्यासाठी दोन्ही संघांसोबतच कोट्यवधी क्रिकेटप्रेमीही खूपच उत्सुक आहेत. (New Zealand cricketer rachin ravindra meet his grandparents in bengaluru see video)
हेही वाचा-
वर्ल्डकप सुरू असतानाच 2 दिग्गजांना पछाडत ‘या’ खेळाडूने जिंकला ICCचा मोठा पुरस्कार, तो नशीबवाण कोण?
भारताला हरवायचं तरी कसं? गिलख्रिस्टने सांगितला मार्ग; म्हणाला, ‘या’ 4 धुरंधरांपासून राहा सावध