---Advertisement---

IND vs NZ Final: न्यूझीलंडने दिलेल्या ‘या’ 3 जखमांचा बदला घेण्याची भारतीय संघाला संधी!

---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा (ICC Champions Trophy 2025) फायनल सामना भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand Final) संघात खेळला जाईल. दरम्यान दोन्ही संघ (9 मार्च) रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने असणार आहे. न्यूझीलंडने भारतावर अनेकदा खोल जखमा केल्या आहेत. आता त्या सर्व जखमांवर भरपाई करण्याची वेळ आली आहे ज्या आता खूप वाढल्या आहेत. कारण आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी न्यूझीलंडचे आव्हान कधीच सोपे ठरले नाही.

न्यूझीलंडने भारतीय संघाला एकामागून एक धक्का दिला आहे. त्यामुळे या सर्व पराभवांचा बदला घेण्याचा भारत नक्कीच प्रयत्न करेल. चला तर मग या बातमीद्वारे आपण न्यूझीलंड संघाने भारताला आतापर्यंत दिलेल्या 3 सर्वात मोठ्या जखमांबद्दल जाणून घेऊया.

1) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2021च्या फायनल सामन्यात पराभव- 2021च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या या जेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 217 धावांवर गारद झाला. यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 249 धावा केल्या. यानंतर, दुसऱ्या डावात, किवी गोलंदाजांनी भारताला 170 धावांवर गुंडाळले आणि 140 धावांचे लक्ष्य 2 गडी गमावून पूर्ण केले. दरम्यान न्यूझीलंडने 8 गडी राखून विजय मिळवला.

2) आयसीसी वनडे विश्वचषक 2019च्या सेमीफायनलमध्ये पराभव- आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंडने भारताला असा धक्का दिला की, भारतीय संघातील खेळाडूंपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण निराश झाले. हा असा सामना होता जो कधीही विसरता येणार नाही. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 239 धावा केल्या.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ राखीव दिवशी खेळण्यासाठी मैदानात आला. एकेकाळी भारताने 92 धावांवर 6 विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर, धोनी आणि जडेजाने एका अद्भुत भागीदारीसह पुनरागमन केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण शेवटी भारताचा 18 धावांनी पराभव झाला.

3) आयसीसी नॉकआउट स्पर्धा 2000च्या फायनल सामन्यात पराभव- हा तो पराभव आहे ज्याची वेदना आजही आठवली की भारतीय चाहत्यांना त्रास होत असेल. जेव्हा आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेच्या फायनल सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला.

आयसीसी नॉकआउट स्पर्धेचा फायनल सामना नैरोबी, केनिया येथे झाला. जिथे भारताने सौरव गांगुलीच्या शतकाच्या जोरावर 6 विकेट गमावून 264 धावा केल्या. ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने न्यूझीलंडला एका वेळी फक्त 132 धावांवर 5 धक्के दिले. पण यानंतर, ख्रिस केर्न्स भारतासाठी खलनायक ठरला आणि त्याने न्यूझीलंडला 4 विकेट्सने विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय खेळाडूची जादू! न्यूझीलंड संघाच्या रणनीतीचा केला पार भुगा
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणत्या भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर
सौरव गांगुलींच 20 वर्षांपूर्वीच रेकॉर्ड भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यात मोडणार का हार्दिक पांड्या?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---