---Advertisement---

WTC Final: भारताविरुद्धच्या लढतीसाठी न्यूझीलंडचा अंतिम संघ जाहीर, पाहा कोण इन कोण आऊट

---Advertisement---

साउथम्पटन | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे (आयसीसी) आयोजित विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना तोंडावर आला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या तुल्यबळ संघांमध्ये १८ ते २२ जूनदरम्यान पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी मंगळवारी (१५ जून) न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी १५ सदस्यीय कसोटी संघ निश्चित केला आहे.

या संघात नियमित कर्णधार केन विलियम्सन आणि यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॅटलिंग यांना स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान या दोन्ही क्रिकेटपटूंना दुखापत झाली होती. विलियम्सनच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती आणि वॅटलिंग पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्यामुळे ते दोघेही दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला मुकले होते. मात्र आता ते दुखापतीतून सावरत असल्याने ते कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असतील.

यासंबंधी माहिती देताना प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, “विलियम्सन आणि वॅटलिंग यांना दुखापतीनंतर विश्रांतीसाठी आणि पुनर्वसनासाठी आठवड्याभराचा कालावधी मिळाला आहे. त्यामुळे ते कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असतील अशी अपेक्षा आहे.” (New Zealand Finalised their 15-man squad For World Test Championship Final Against India)

महत्त्वाचे म्हणजे, ३५ वर्षीय वॅटलिंगसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आणि अविस्मरणीय असणार आहे. कारण या सामन्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करणार असल्याची घोषणा केली आहे.

पाच खेळाडू झाले संघाबाहेर
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडच्या मायभूमीत २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे. या मालिकेत त्यांनी १-० असा विजय मिळवला आहे. या सामन्यासाठी एकूण २० सदस्यीय संघाची निवड करण्यात आली होती. याच संघातील १५ खेळाडूंना भारताविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. डग ब्रेसवेल, जॅकब डफी, डॅरेल मिचेल, रचिन रविंद्र आणि मिचेल सेंटनर या ५ खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे.

असा आहे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघ– केन विलियम्सन (कर्णधार), टॉम बंडल, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, मॅच हेनरी, कायल जेमिसन, टॉम लॅथम, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, टीम साउथी, रॉस टेलर, निल वॅगनर, बीजे वॅटलिंग आणि विल यंग

महत्त्वाच्या बातम्या-

फर्स्ट स्टॉप बॉम्बे! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेटपटू मुंबईत जमायला सुरुवात, फोटोंचा सोशलवर धुमाकूळ

सारा तेंडुलकरने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ, चाहत्यांना आली शुबमन गिलची आठवण

‘या’ कारणामुळे रोहितसह शुबमनही किवी गोलंदाजांपुढे येणार अडचणीत, माजी अष्टपैलूचा दावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---