क्रिकेट विश्वात ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. २१ वर्षीय साराचे इंस्टाग्रामवर जवळपास १२ लाख फॉलोवर्स आहेत. ४३३ लोकांना फॉलो करणाऱ्या साराने आतापर्यंत ७९पेक्षा जास्त पोस्ट केल्या आहेत. याच साराचे नाव बऱ्याच वेळा भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलसोबत जोडले जाते. त्याला कारण म्हणजे साराने बऱ्याच वेळा ठेवलेली इंस्टा स्टेटस.
साराने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना शुबमन गिलची आठवण होऊ लागली. गेल्यावर्षी सारा आणि शुबमनच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या.
११ जून रोजी सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती बरीच मजा करताना दिसत आहे. साराने हा व्हिडिओ पोस्ट करताच त्यावर लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडला आहे. परंतू यातील बहुतांश कमेंट्स या शुबमन गिल संदर्भात आहेत.
या व्हिडिओमध्ये सारा वेगवेगळ्या मूडमध्ये दिसत आहे. तिने क्रीम कलरचा ओव्हर साईज ड्रेस घातला आहे. चष्मा घालून सारा व्हिडिओमध्ये मस्ती करत असल्याचे दिसून येते. यानंतर काही चाहत्यांनी शुबमनला तिच्या या पोस्टवर टॅगही केले आहे.
गेल्यावर्षी आयपीएल दरम्यान सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शुबमन गिलचा एक व्हिडीओ ठेवला होता. त्यानंतर अशी अफवा पसरली होती की सारा आणि शुबमन एकमेकांना डेट करत आहेत. परंतू दोघांनीही यावर बोलण्यास नकार दिला होता.
शुबमन गिल सध्या इंग्लंडमध्ये आहे. टेस्ट चँपियनशीपसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली असून त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर इंग्लंडसोबत होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या भारतीय संघात देखील त्याची निवड झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
कसोटी मालिकेपुर्वी दिग्गजाची इंग्लंडला चेतावणी; म्हणाले, ‘रोहित सहज २-३ शतके ठोकणार’