बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना मंगळवारी (26 सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंड संघाने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने ही मालिका 0-2 अशी आगाडी घेत जिंकली. मागच्या 15 वर्षांमध्ये बांगलादेशमध्ये न्यूझीलंडला पहिल्यांदा वनडे मालिका जिंकता आली. तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडचा सलामीवीर वील जॅक्स सामनावीर ठरला.
बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्याचा एखंदरीत विचार केला, तर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने अवघ्या 34.5 षटकांमध्ये 175 धावा केल्या आणि विजय मिळवला. सलामीवीर वील जॅक्स याने 80 चेंडूत 70 धावांची खेळी केली. बांगलादेशसाठी नजमूल हुसेन शांतो याने 84 चेंडूत 76 धावांची खेळी केली. ऍडम मिल्ने याने 6.4 षटकांमध्ये 34 धावा खर्च करून सर्वाधिक चार बांगलादेशी खेळाडूंना तंबूत पाठवले. न्यूझीलंडसाठी हेनरी निकोलस याने 86 चेंडूत 50 धावांची खेळी केली. (New Zealand has won an ODI series in Bangladesh after 15 long years)
महत्वाच्या बातम्या –
अभिमानास्पद! चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताने घोडेस्वारीत जिंकलं गोल्ड मेडल
विश्चचषक ट्रॉफीच्या मरवणुकीत पावसाची हजेरी, पुण्यातील ‘FC Road’वर चाहत्यांचा झिंगाट डान्स