भारतीय क्रिकेट संघाने यावर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेली चार सामन्यांची कसोटी मालिका ३-१ ने जिंकली होती. ही कसोटी मालिका खिशात घालत भारताने आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या सामन्यात भारताचा सामना बलाढ्य न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी बुधवारी (०७ एप्रिल) न्यूझीलंडने २० सदस्यीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. या संघात तीन अनकॅप खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रचिन रविंद्र, जॅकब डफी आणि डेविन कॉन्वे अशी या खेळाडूंची नावे आहेत.
JUST IN: New Zealand have named a 20-man squad for their Test tour of England, including the World Test Championship final against India.
Rachin Ravindra and Jacob Duffy join Devon Conway as the players uncapped at Test level called up for the tour. pic.twitter.com/Q3aW5a85NS
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 7, 2021
भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यापुर्वी न्यूझीलंड संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीही हाच संघ निवडण्यात आला आहे.
न्यूझीलंडने यापूर्वीच अंतिम सामन्यात जागा पक्की केली होती. त्यानंतर भारताने इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभवाची धूळ चारत पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचा मान मिळवला आहे.
हा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साउथँम्पटन येथील रोज बाऊल स्टेडियमवर खेळवला जाईल. खरंतर हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार होता. मात्र, कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता हा सामना लॉर्ड्सवरुन साउथँम्पटन येथे हलवण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर सर्वकाही बदललं, माझ्या आईने चिकन विकण्याचं कामही बंद केलं आहे”
सीएसकेला दिलासा! कागिसो रबाडासह ‘हा’ दिल्लीकर मुकणार सुरुवातीच्या आयपीएल सामन्याला
धोनीने ‘तो’ सल्ला दिला अन् माझं नशीब बदललं; टी नटराजनने सांगतली ‘राज की बात’






