न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनचे (Lockie Ferguson) कोरोना व्हायरसचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्याला असणारा कोरोना व्हायरसचा धोका टळला आहे. फर्ग्यूसन काल (13 मार्च) सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या वनडे सामन्यात खेळला होता.
या सामन्यानंतर त्याने घसा दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला कालपासून अन्य खेळाडूंपासून दूर ठेवण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून त्याची तपासणी करण्यात आली. पण या तपासणीमध्ये त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
फर्ग्यूसनने काल (13 मार्च) सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामन्यात 9 षटकात 60 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. पण हा सामना ऑस्ट्रेलियाने 71 धावांनी जिंकला.
मात्र जगभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता ही उर्वरित वनडे मालिका रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ शनिवारी पुन्हा मायदेशी परतणार आहे. तर फर्ग्यूसन रविवारी न्यूझीलंडला परतणार आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनचीही कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आली होती. त्याचीही तपासणी निगेटीव्ह आली.
ट्रेंडिंग घडामोडी-
– जडेजाच्या जादूटोण्यामुळे रणजी ट्रॉफी फायनलमध्ये बंगालचा झाला पराभव? पहा व्हिडिओ
– कोरोना इफेक्ट: कॅप्टन कोहलीचा चाहत्यांना खास संदेश
– कोरोनाने अवघड केलं! धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सलाही बसला…