वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचवा वन-डे सामना उद्या (3 फेब्रुवारी) होणार आहे. पाच सामन्यांची ही वन-डे मालिका भारताने 3-1 अशा फरकाने आधीच आपल्या नावे केली आहे. या मालिकेत या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकल्यानंतर चौथ्या सामन्यात भारताला 8 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.
मात्र या चौथ्या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडला पाचव्या सामन्याआधीच धक्का बसला आहे. त्यांचा धडाकेबाज सलामीवीर मार्टीन गप्टील हा आज (2 फेब्रुवारी) सराव करताना दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे त्याच्या उद्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने गप्टीलबाबत ट्विट करत त्याच्या दुखापतीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर काॅलिन मुन्रोचे संघात पुनरागमन झाले आहे. तो उद्यापासून संघाशी जोडला जाणार आहे. तो चौथ्या सामन्यात खेळला नव्हता, अशीही माहिती न्यूझीलंड क्रिकेटने दिली आहे.
Martin Guptill is in doubt for tomorrow’s fifth ODI against India after aggravating his lower back while fielding this afternoon. He's been assessed by team physio Vijay Vallabh & will be reassessed tomorrow morning. Colin Munro will rejoin the ODI squad tomorrow morning #NZvIND pic.twitter.com/grfVzgvHTa
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 2, 2019
गप्टील क्षेत्ररक्षणाचा सराव करत होता तेव्हा त्याला कमरेला दुखापत झाली. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्याची या मालिकेत निराशाजनक कामगिरी झाली आहे. यामध्ये त्याने 4 सामन्यांमध्ये खेळताना 11.75च्या सरासरीने फक्त 47 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–सांगली एक्सप्रेस स्म्रीती मंधनाने जागतिक क्रमवारीतही घेतली मोठी झेप
–एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे मोठी खुशखबर
–तेंडुलकर-गांगुलीच्या त्या विक्रमला रोहित शर्माकडून आहे धोका