---Advertisement---

…म्हणून न्यूझीलंडचे खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत काळी पट्टी बांधून उतरले मैदानात

---Advertisement---

माउंट मोंगनूई| न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्ध बे ओव्हल स्टेडियमवर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत बुधवारी (३० डिसेंबर) १०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात शेवटच्या दिवशी न्यूझीलंडचे क्रिकेटपटू दंडाला काळीपट्टी बांधून मैदानात उतरले होते.

न्यूझीलंड क्रिकेटपटूंनी या सामन्यात माजी दिग्गज क्रिकेटपटू जॉन एफ रीड यांच्या स्मरणार्थ काळी पट्टी दंडाला बांधली होती. याबद्दल न्यूझीलंडने ट्विटरवरुन माहिती दिली.

न्यूझीलंडकडून खेळलेले जॉन एफ रीड यांचे मंगळवारी निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. रीड हे बऱ्याच काळापासून आजारी होते.

जॉन एफ रीड हे ८०च्या दशकातील न्यूझीलंड संघाचा एक महत्वाचा भाग होते. न्यूझीलंडच्या संघाकडून खेळलेल्या १९ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ६ शतके ठोकली. त्यांची ४६च्या सरासरीने आपल्या कारकिर्दीत १२९६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून जलद १००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ते अव्वल स्थानावर आहेत.

तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत २५ वनडे सामनेही खेळले. यात त्यांनी ४ अर्धशतकांसह ६३३ धावा केल्या. याशिवाय त्यांनी १०१ प्रथम श्रेणी सामने खेळताना ५६५० धावा केल्या. यात त्यांनी ११ शतके ठोकली.

महत्त्वाच्या बातम्या –

अभिमानास्पद क्षण! रहाणेचे नाव दुसऱ्यांदा मेलबर्नच्या ऑनर्स बोर्डवर, पाहा व्हिडिओ

मेलबर्न कसोटी जरी जिंकली तरी टीम इंडियाच्या ‘या’ तीन खेळाडूंना करावी लागेल सुधारणा

…म्हणून रविंद्र जडेजाला दिले जाते भारतीय संघात स्थान, रवि शास्त्री यांनी केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---