बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करताना ऑस्ट्रेलिया संघाला 8 विकेट्सने मात दिली. या सामन्यात अजिंक्य रहाणेने शानदार नेतृत्व केले. त्याचबरोबर या सामन्यात रविंद्र जडेजाने सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाने सहज विजय मिळवला. आता भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी रविंद्र जडेजाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचे म्हणणे आहे की, रविंद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळण्यासाठी सक्षम आहे. परंतु त्याची अष्टपैलू कामगिरी कसोटीत भारतीय संघासाठी संतुलन निर्माण करते.
रवि शास्त्री यांना प्रश्न विचारला होता की, भारतीय संघ जडेजाला विशेषज्ञ फलंदाज म्हणून बघतो का? यावर उत्तर देताना रवि शास्त्री म्हणाले, “तो वास्तविकपणे अष्टपैलू खेळाडू आहे, या कारणामुळे तो भारतीय संघाचा भाग आहे. तो परिस्थितीनुसार सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो किंवा पाचव्या क्रमांकावरही परंतु, तो खरंतर अष्टपैलू खेळाडू आहे. या कारणामुळे भारतीय संघाला संतुलन मिळते.”
शास्त्री म्हणाले. “त्याचबरोबर आम्ही जेव्हा विदेशात खेळतो, तेव्हा शंका असते की वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त होवू शकतो. आपण उमेश यादवच्या बाबतीत बघितले. त्यामुळे जडेजा असल्याने संघाला संतुलन लाभते. तसेच अश्विन सोबत गोलंदाजी केल्याने वेगवान गोलंदाजांना आराम मिळतो.”
चार सामन्याच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतीय संघाने मालिकेत 1-1ने ऑस्ट्रेलिया सोबत बरोबरी केली आहे.
दुसर्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाचा भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या जागी संघात समावेश करण्यात आला होता. जडेजाने या सामन्यात गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. त्याचबरोबर पहिल्या डावात फलंदाजी करताना 159 चेंडूत 57 धावांची खेळी केली. या योगदानामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली.
भारतीय कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करताना जडेजाने 50 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 216 विकेट्स आणि 1926 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सुरू होणारा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सिडनी कसोटीत रोहित शर्माला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? रवि शास्त्रींनी दिले ‘हे’ उत्तर
वयाच्या १७ व्या वर्षी भारताकडून पदार्पण करणाऱ्या क्रिकेटपटूचा भाजपात प्रवेश
डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ