माऊंट मॉनगनुई| भारताचा न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वन-डे सामना बे ओव्हल मैदानावर आज (28 जानेवारी) पार पडला असून भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या मालिकेतील उर्वरित चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. या सामन्यांसाठी न्यूझीलंड वनडे संघात अष्टपैलू जिमी निशाम आणि टॉड ऍस्टलचे पुनरागमन झाले आहे.
ऍस्टलला फिरकीपटू इश सोधी ऐवजी तर निशामला डॉ ब्रासवेल ऐवजी संघात संधी देण्यात आली आहे.
ऍस्टल आणि निशाम यांना दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या तीन वनडे सामन्यांना मुकावे लागले होते. निशामला हॅमस्ट्रिंगची दुखापत होती. तर ऍस्टलला गुडघा दुखापत होती. पण त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांचा फिटनेस सिद्ध केला असल्याने त्यांना पुन्हा संघात घेण्यात आले आहे.
याबद्दल न्यूझीलंडचे निवड समीती अध्यक्ष गॅविन लर्सेन म्हणाले यांनी या दोघांचेही संघात पुन्हा स्वागत केले आहे. तसेच ते या मालिकेत कशी कामगिरी करतात याची उत्सुकता असल्याचेही ते म्हटले आहेत.
या मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना अनुक्रमे हेमिल्टन आणि वेलिंगटन येथे 31 जानेवारी आणि 3 फेब्रुवारीला पार पडणार आहे.
चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी असा आहे न्यूझीलंडचा संघ-





