न्यूझीलंडने आयसीसी टी20 विश्वचषक 2026 साठी संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघाला ड गटात मध्ये ठेवण्यात आलं आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि युएई यांचाही समावेश आहे. किवी संघ टी20 फॉरमॅटमधील त्यांच्या पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. न्यूझीलंड संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी मिचेल सँटनरच्या खांद्यावर असेल.
कर्णधार मिचेल सँटनरसह पाच खेळाडू दुखापतींमधून सावरत आहेत. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा टी20 गोलंदाज जेकब डफीची त्याच्या पहिल्या टी20 विश्वचषक संघात निवड झाली आहे. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री हे दोघेही लवकरच बाबा होणार आहेत, त्यामुळे दोन्ही खेळाडू स्पर्धेदरम्यान काही काळासाठी संघाबाहेर असण्याची शक्यता आहे.
लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री आणि एडम मिल्ने हे वेगवान गोलंदाज आहेत. जिमी नीशम हा अष्टपैलू वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. कर्णधार मिचेल सँटनर, इश सोढी, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र हे फिरकी गोलंदाजीचे पर्याय आहेत. भारत आणि श्रीलंकेत टी20 विश्वचषक होणार असून न्यूझीलंडने फिरकी गोलंदाजीला प्राधान्य देत संघ निवड केली आहे.





