न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तानला चौथ्या टी20 सामन्यामध्ये 115 धावांनी पराभूत केले आहे. यामध्ये टिम सेफर्ट (44), फिन एलन (50) यांनी न्यूझीलंडसाठी धमाकेदार सुरुवात केल्यानंतर कर्णधार मायकल ब्रेसवेल यांनी 46 धावा करून त्यांचा डाव संपवला. पाकिस्तान संघाला जिंकण्यासाठी 221 धावांचं आव्हान मिळालं होतं, पण संपूर्ण संघ 105 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडने 115 धावांनी विजय मिळवून पाकिस्तानचा दारुण पराभव केलेला आहे. तसेच 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे.
पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टिम सेफर्ट आणि फिन एलनने न्युझीलंड कडून चांगली सुरुवात केली. दोघांनीही पहिला खेळाडू बाद होण्याआधी 4 षटकात 59 धावांची भागीदारी रचली. सेफर्टने 22 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. तसेच फिन एलनने 20 चेंडूत 50 धावांची महत्त्वपूर्ण पारी खेळली. त्यामध्ये त्याने 3 षटकार आणि 6 चौकार ठोकले.
मार्क चैपमैनने 16 चेंडूत तसेच डेरिल मिशेलने 23 चेंडूत दोघांनी 29 धावा करून महत्त्वपूर्ण कामगिरी निभवली. शेवट कर्णधार मायकल ब्रेसवेल याने 26 चेंडूत 46 धावा केल्या, यामध्ये त्याने 2 षटकार आणि 5 चौकार झळकावले. न्यूझीलंडने पाकिस्तानला जिंकण्यासाठी 221 धावांचं लक्ष दिलं होतं.
पाकिस्तानचा अर्धा संघ तर पावरप्लेच्या आतच बाद झाला. सलामीवीर जोडी मोहम्मद हरीस (2) तर हसन जवाज (1) धावांवर बाद झाले. कर्णधार सलमान आगा अवघ्या (1) धावांवर परत गेला. तसेच शादाब खान सुद्धा (1) आणि खुशदिल शाह (6) धावांवर बाद झाले. संघासाठी सर्वात जास्त अब्दुल समद याने 30 चेंडूत 44 धावा केल्या.
न्यूझीलंडच्या डफीने पाकिस्तानच्या फलंदाजांचा चांगलाच धुवा उडवला. त्याने सलामीवीर फलंदाज हसन नवाज (1) कर्णधार सलमान आगा (1) इरफान खान नियाजी (24) हरीश रऊफ (6) यांना बाद करत 4 विकेट्स घेतल्या.
ज़कारी फ़ौल्कसने सुद्धा न्यूझीलंडसाठी 4 षटकात 25 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय जेम्स नीशम, ईश सोढ़ी आणि विल ओरौर्केने 1-1 विकेट घेतली.






