न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले असून वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिली वनडे पाकिस्तानने जिंकली, तर बुधवारी (11 जानेवारी) झालेली दुसरी वनडे न्यूझीलंडने जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. याबरोबरच त्यांनी वर्ल्ड सुपर लीगच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेत भारताला मागे टाकले.
न्यूझीलंडचे वर्ल्ड सुपर लीगमध्ये 140 पॉइंट्स झाले आहेत. भारताचे 139 पॉइंट्स असून पाकिस्तान 130 पॉइंट्समुळे तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड (125) चौथ्या, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचे समान असे 120 पॉइंट्स असून ते अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.
वर्ल्ड सुपर लीगच्या या गुणतालिकेत भारताबरोबर एकूण 8 संघ 2023च्या वनडे विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. या विश्वचषकासाठी भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान पात्र ठरले आहेत, तर आणखी दोन संघांना संधी असून त्यांना क्वालिफायरचे सामने खेळावे लागणार आहे. या क्रमवारीत पहिल्या आठ संघाच्याबाहेर श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका आहेत. त्यातील श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेकडे 2023चा विश्वषक खेळण्याची संधी आहे. त्यासाठी ते कसे शर्यतीत परत येतात, हे उत्सुकतेचे ठरणार आहे.
New Zealand leapfrop India to go top of the ICC @cricketworldcup Super League standings 🔥
Details 👉 https://t.co/fTVi7BH2AB pic.twitter.com/agCf9p9BnL
— ICC (@ICC) January 12, 2023
आयसीसी वर्ल्ड सुपर लीगचा हा पहिलाच हंगाम आहे. यामध्ये 13 संघ सहभागी असून प्रत्येकांना घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर मिळून 8 मालिका खेळायच्या आहेत. प्रत्येक मालिकेत 3 सामने होतात. जिंकणाऱ्या संघाला 10 अंक, तर बरोबरीत राहिलेल्या मालिकेत दोन्ही संघांना 5-5 अंक दिले जातात.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. डेवॉन कॉनवेचे शतक आणि विलियम्सनच्या 85 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 262 धावांचे लक्ष्य दिले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (79 धावा) याच्याशिवाय एकही पाकिस्तानी फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही आणि त्यांनी 43 षटकात 182 धावसंख्येवरच सर्व विकेट्स गमावल्या. हा सामना न्यूझीलंडने 79 धावांनी जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईडन गार्डन, 33 चौकार-9 षटकार; 8 वर्षापूर्वी झालेल्या भारत-श्रीलंका सामन्याने बदलला होता वनडेचा इतिहास
शानदार उद्घाटन सोहळ्याने वाजले हॉकी वर्ल्डकप 2023 चे बिगूल, विश्वविजयासाठी भिडणार 16 संघ