---Advertisement---

टॉप ५: भारत-न्यूझीलंड संघातील दुसऱ्या कसोटीत होऊ शकतात हे विक्रम…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2020 7:20 PM
---Advertisement---

क्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना उद्यापासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर सुरु होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4 वाजता सुरु होईल.

या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडच्या काही खेळाडूंना खास विक्रम करण्याची संधी आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात होऊ शकतात हे विक्रम  – 

1. जर या सामन्यात मयंक अगरवालने 36 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो कसोटीमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल. सध्या मयंकच्या 10 कसोटी सामन्यातील 15 डावात 64.27 च्या सरासरीने 964 धावा आहेत.

तसेच सध्या कसोटीत सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर विनोद कांबळी असून त्याने 14 डावात 1000 कसोटी धावांचा टप्पा पार केला होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे चेतेश्वर पुजारा आणि सुनील गावस्कर आहेत. पुजाराने 18 डावात तर गावस्करांनी 21 व्या डावात 1000 कसोटी डावांचा टप्पा पार केला होता.

2. जर विराटने या सामन्यात 116 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22,000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार करेल. तसेच हा टप्पा पार करणारा सचिन तेंडुलकर(34,357) आणि राहुल द्रविड(24,208) नंतरचा तो तिसराच भारतीय ठरेल, तर जगातील एकूण आठवा क्रिकेटपटू ठरेल. सध्या विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 21,884 धावा आहेत.

3. आर अश्विनने या सामन्यात जर 2 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत 50 विकेट्स घेणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरेल. याआधी बिशन सिंग बेदी(57), इरापल्ली प्रसन्ना(55) आणि अनिल कुंबळे(50) यांनी हा पराक्रम केला आहे.

4. त्याचबरोबर अश्विनने या सामन्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार करेल.

5. केन विलियम्सनने या सामन्यात जर 7 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो न्यूझीलंडमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या न्यूझीलंडच्या कर्णधारांच्या यादीत ब्रेंडन मॅक्यूलमला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर येईल.

सध्या न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडच्या कर्णधारांनी कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विलियम्सन 1473 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मॅक्यूलम 1479 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अव्वल क्रमांकावर 1842 धावांसह स्टिफन फ्लेमिंग आहे.

6. टीम साऊथीने जर या सामन्यात 3 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 550 विकेट्स घेण्याचा टप्पा पार करेल. तसेच हा टप्पा पार करणारा न्यूझीलंडचा तिसरा क्रिकेटपटू ठरेल. याआधी सर रिचर्ड हॅडली(589) आणि डॅनिएल विट्टोरी(696) यांनी असा पराक्रम केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---