न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात शनिवारी(26 जानेवारी) दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 90 धावांनी विजय मिळवून 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या नाणेफेकी वेळी एक खास गोष्ट पहायला मिळली होती.
हा सामना सुरु होण्याआधी जेव्हा नाणेफेकीसाठी केन विलियमसन आणि विराट कोहली हे दोन्ही कर्णधार मैदानावर आले त्यावेळी 9 वर्षीय हन्ना रावल या नावाची लहान मुलगीही त्यांच्याबरोबर मैदानात उपस्थित होती.
ती एमएस धोनीची खूप मोठी चाहती असून तिला न्यूझीलंड कर्णधार विलियमसनकडे नाणेफेकीचे नाणे देण्यासाठी एएनझेड बँकने नामांकित केले होते. हन्ना हिला तिचे वडील निलय रावल यांनी धोनी असे टोपन नाव दिले आहे. याचे कारण सांगताने ते म्हणाले ती धोनीला आदर्श मानत असून त्याच्यासारखेच क्रिकेट खेळते.
डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार तीचे वडील म्हणाले, ‘एएनझेड बँकने तिला नाणेफेकीवेळी दोन्ही कर्णधारांबरोबर उपस्थित राहण्याच्या संधीसाठी एका ड्रॉमधून नामांकित केले.’
‘ती विलियमसनला नाणेफेकीचे नाणे देणार होती. हन्नाचा वाढदिवस 31 जानेवारीला आहे. पण तिला त्याआधीच तिच्या वाढदिवसाची मोठी भेट मिळाली आहे. ती 2014 मध्ये जेव्हा न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघ आला होता तेव्हा ती हॅमिल्टन ग्राउंडवरही आली होती.’
तसेच हन्ना ही धोनीची मोठी चाहती असल्याचे सांगताना निलय म्हणाले, ‘हन्ना ही धोनीची चाहती आहे आणि तिचे टोपननाव धोनी असे आहे. ती धोनीसारखेच क्रिकेट खेळते आणि धोनी प्रमाणेच दिवसभरात कमीतकमी 1ते 2 लीटर दूध पिते.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘ज्या उपनगरात विलियमन 2014-15मध्ये राहायचा त्याच ओटुमोटेल या उपनगरात हन्ना हिने क्रिकेट खेळाला सुरुवात केली.’
शनिवारी झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकताना प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 325 धावांचे लक्ष ठेवले होते.
भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी अनुक्रमे 87 आणि 66 धावांची खेळी केली होती. यावेळी विराटने 5 चौकाराच्या मदतीने 45 चेंडूत 43 धावा केल्या. तसेच अंबाती रायडूने 47 धावा आणि यष्टीरक्षक एमएस धोनीने नाबाद 48 धावा केल्या होत्या.
भारतीय गोलंदाजांमध्ये कुलदिप यादवने 45 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2, मोहम्मद शमी आणि केदार जाधव या दोघांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–शून्यावर बाद झाल्यानंतर ६८ वर्षीय क्रिकेटपटूने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती
–कुलदिप यादव, युजवेंद्र चहलची चमकदार कामगिरी सुरूच…
–नेपाळच्या या १६ वर्षीय युवा क्रिकेटपटूने मोडला सचिन तेंडुलकरचा २९ वर्षीय जूना विक्रम