---Advertisement---

क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाले असे फोटोसेशन, जाणून घ्या कारण

On: मंगळवार, जानेवारी 22, 2019 7:53 PM
---Advertisement---

विराट कोहली कर्णधार असलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवून न्यूझीलंड दौऱ्यासाठी नेपीयरला दाखल झाला आहे. या न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय पुरुष संघ 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

याबरोबरच भारतीय महिला संघही न्यूझीलंड दौऱ्यासाठी नेपीयर येथे दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड पुरुष संघाची वनडे मालिका 23 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर मिताली राज कर्णधार असलेल्या भारतीय महिला संघाचा न्यूझीलंड महिला संघाविरुद्धची वनडे मालिका 24 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या दोन्ही मालिकेतील पहिले सामने नेपीयर येथे होणार आहेत.

या वनडे मालिकेत न्यूझीलंडच्या पुरुष संघाचे नेतृत्व केन विलियमसन करणार आहे आणि महिला संघाचे नेतृत्व एमी सदर्थवेट करणार आहे.

त्यामुळे वनडे मालिकेआधी ट्रॉफीसमवेतच्या फोटोसेशनसाठी भारताचे मिताली राज आणि विराट कोहली तर न्यूझीलंडचे केन विलियमसन आणि एमी सदर्थवेट ही चारही कर्णधार एकत्र उपस्थित होते. या चौघांचेही हे फोटोसेशन एकत्र पार पडले.

याचे फोटोसेशन दरम्यानचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तसेच या दौऱ्यातील सर्व टी20 सामने अनुक्रमे वेलिंगटन, ऑकलंड आणि हॅमिल्टन येथे 6, 8 आणि 10 फेब्रुवारीला होणार आहेत. हे सर्व सामने double headers अर्थात महिला आणि पुरुषांचे एकाच दिवशी होणार आहे.

असा आहे भारताच्या पुरुष संघाचा न्यूझीलंड दौरा- 

वनडे मालिका-

पहिला वनडे सामना- नेपीयर- २३ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता

दुसरा वनडे सामना- माऊंट मॉनगनुई- २६ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता

तिसरा वनडे सामना- माऊंट मॉनगनुई- २८ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता

चौथा वनडे सामना- हॅमिल्टन-  ३१ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता

पाचवा वनडे सामना- वेलिग्टंन- ०३ फेब्रुवारी, सकाळी ७.३० वाजता

टी२० मालिका-

पहिला टी२० सामना- वेलिग्टंन- ०६ फेब्रुवारी, दुपारी १२.३० वाजता

दुसरा टी२० सामना- ऑकलंड- ०८ फेब्रुवारी, सकाळी ११.३० वाजता

तिसरा टी२० सामना-  हॅमिल्टन- १० फेब्रुवारी, दुपारी १२.३० वाजता

असा आहे भारतीय महिला संघाचा न्यूझीलंड दौरा- 

वनडे मालिका –

पहिला वनडे सामना –  नेपियर – २४ जानेवारी, सकाळी ६.३० वाजता

दुसरा वनडे सामना-  माऊंट मॉनगनुई  – २९ जानेवारी, सकाळी ६.३० वाजता

तिसरा वनडे सामना- माऊंट मॉनगनुई  – १ फेब्रुवारी, सकाळी ६.३० वाजता

टी २० मालिका – 

पहिला टी२० सामना- वेलिग्टंन- ०६ फेब्रुवारी, सकाळी ८.३० वाजता

दुसरा टी२० सामना- ऑकलंड- ०८ फेब्रुवारी, सकाळी ८.३० वाजता

तिसरा टी२० सामना-  हॅमिल्टन- १० फेब्रुवारी, सकाळी ८.३० वाजता

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय पुरुष संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय पुरुष संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), विजय शंकर, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, शुभमन गिल, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिदार्थ कौल, खलील अहमद.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय महिला संघ-

मिताली राज(कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्म्रीती मानधना, पुनम राऊत, दीप्ति शर्मा, दयालन हेमालता, जेमिमा रॉड्रिगेज, मोना मेश्राम, तानिया भाटिया, एकता बिष्त, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, शिखा पांडे

न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय महिला संघ- 

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मानधना, (उपकर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिगेज, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिष्त, दयालन हेमालता, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, प्रिया पूनिया, शिखा पांडे.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंड-भारत वनडे मालिकेत विराट कोहलीला हा खेळाडू ठरू शकतो वरचढ

आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावल्यानंतर कर्णधार कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया

कोहली, कोहली…! सोशल मीडियातून होतोय किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment