---Advertisement---

कोहली, कोहली…! सोशल मीडियातून होतोय किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

On: मंगळवार, जानेवारी 22, 2019 5:22 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज आयसीसीने जाहिर केलेल्या 2018 च्या पुरस्कारांमध्ये बोलबाला राहिला आहे. त्याने आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत.

त्याचा आयसीसीने सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने गौरव केला आहे. याचबरोबर विराटने यावर्षीचा सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा आणि कसोटीपटूचाही पुरस्कार मिळवला आहे.

सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवण्याची विराटची ही तिसरी वेळ आहे. याआधी त्याने 2012, 2017 मध्ये हा पुरस्कार मिळवला आहे. तसेच विराटने यावर्षी पहिल्यांदाच सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळवला आहे.

त्यामुळे एकाच वर्षात आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू, वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू हे तीनही महत्त्वाचे पुरस्कार मिळवणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

याचबरोबर आयसीसीने 2018 चे वनडे आणि कसोटीचा 11 जणांचा सर्वोत्तम संघही जाहीर केला असून या दोन्ही संघाचा कर्णधारही विराटला करण्यात आले आहे.

त्यामुळे विराटसाठी आजचा दिवस सोनियाचा दिवस ठरला आहे. त्याच्यावर क्रिकेट जगतातूनही अनेक दिग्गजांनी कौतुकाचा वर्षाव करताना त्याचे कौतुक केले आहे. विराटने 2018 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 37 सामन्यातील 47 डावात 68.37 च्या सरासरीने 2735 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 11 शतकांचा आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

सोशल मीडियातून अशा आल्या विराट कोहलीसाठी कौतुकाच्या प्रतिक्रिया –

https://twitter.com/RCBTweets/status/1087629536198414338

महत्त्वाच्या बातम्या-

या ४ भारतीय क्रिकेटपटूंना २००४पासून मिळाले आहेत सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचे पुरस्कार

विराट कर्णधार असलेला आयसीसी २०१८चा सर्वोत्कृष्ठ कसोटी संघ जाहीर, भारताच्या तीन खेळाडूंचा सहभाग

आयसीसी पुरस्कारात बाजी मारणाऱ्या किंग कोहलीने केले हे खास ५ विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment