---Advertisement---

मोहम्मद रिझवानचे दमदार अर्धशतक; तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानने व्हाईटवाॅश टाळला

On: मंगळवार, डिसेंबर 22, 2020 7:22 PM
---Advertisement---

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात नेपियर येथे खेळण्यात आलेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात फहीम अशरफ याच्या शानदार गोलंदाजीनंतर यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद हाफिज यांच्या दमदार फलंदाजीमुळे पाकिस्तानने हा सामना जिंकला. मात्र ही मालिका न्यूझीलंडने 2-1 या फरकाने आपल्या नावावर केली.

मोहम्मद रिझवानला त्याच्या दमदार (89) खेळीमुळे सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला, तर टीम सेफर्टला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला. नेपियरच्या मैदानात मंगळवारी खेळण्यात या सामन्यात न्यूझीलंड संघाने 7 गडी गमावून 174 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 2 चेंडू आणि 4 गडी राखत विजय मिळवला.

सलामी फलंदाज मोहम्मद रिझवान याने दमदार खेळी करताना 59 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकार ठोकत 89 धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिली विकेट 40 धावसंख्येवर हैदर अलीच्या (11)रूपाने गमावली. त्याच्यानंतर मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद हाफिजने दुसर्‍या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. त्यांनतर पाकिस्तान संघाने 112 धावसंख्येवर हाफिजच्या (41) रूपाने दुसरी विकेट गमावली. त्यानंतर एका बाजूने पडझड होत असली तरी रिझवानने झुंजार खेळी करत पाकिस्तानचा विजय निश्चित केला. न्यूझीलंड संघाकडून टीम साउदी आणि स्कॉट कुगेलीनने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी न्यूझीलंड संघाला आमंत्रित केले. न्यूझीलंड संघाकडून डेवोन कॉन्वे 63 आणि टीम सेफर्ट 35 धावांच्या जोरावर न्यूझीलंड संघाने 7 विकेट्स गमावून 173 धावा केल्या. सलामी फलंदाज मार्टिन गप्टील 19 धावा करून बाद झाला. त्याचबरोबर ग्लेन फिलिप्सने 31 धावांचे योगदान दिले. पाकिस्तान संघाकडून सर्वाधिक 3 विकेट फहीम अशरफने घेतल्या, तर शाहीन आफ्रिदी आणि हैरिस रउफने यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंड संघाने पहिले दोन टी-20 सामने जिंकून यापूर्वीच मालिकेत विजय मिळवला होता. परंतु क्लीनस्विप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या न्यूझीलंड संघाला तिसर्‍या टी-20 सामन्यात 4 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे. मात्र मालिका 2-1 या फरकाने जिंकली. या तीन सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणार्‍या टीम सेफर्टला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या:
– बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल
तुम्ही अलिकडे जरा विचित्र वक्तव्य करताय; स्मिथचे ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला जोरदार प्रत्युत्तर
मी विराटच्या जागी असतो तर राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिले असते, भारताच्या माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---