पाकिस्तानच्या न्यूझीलंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला २६ डिसेंबर रोजी माउंट मोनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर सुरुवात झाली होती. या सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघाने ४३१ डावांचा डोंगर उभा केला. कर्णधार केन विलीअम्सनची शतकी खेळी न्यूझीलंडच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास उतरलेल्या पाकिस्तानी संघाला सुरुवातीलाच एक झटका दिला. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानने १ बाद ३० धावा केल्या असून ते ४०१ धावांनी पिछाडीवर आहेत.
विलिअम्सनचे शानदार शतक
कालच्या ३ बाद २२२ धावसंख्येवरून पुढे सुरुवात करताना सावध सुरुवात केली. काल ९४ धावांवर नाबाद असलेल्या विलिअम्सनने नसीम शहाच्या गोलंदाजीवर आपले कारकिर्दीतील 23वे शतक पूर्ण केले. तसेच त्याला साथ देणाऱ्या हेन्री निकोल्सने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यांनतर निकोल्स नसीम शहाच्या गोलंदाजीवर तर विलिअम्सन यासिर शहाच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतले.
लागोपाठ दोन फलंदाज बाद झाल्याने न्यूझीलंड साडेतीनशे धावांचा टप्पाही गाठू शकेल की नाही, याबाबत शंका होती. मात्र यष्टीरक्षक बी जे वॅटलिंगने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत न्यूझीलंडला ४०० धावांची वेस ओलांडून दिली. त्याने १४५ चेंडूत ७३ धावांची खेळी साकारली तर कायले जेमिसनने ३२ धावा काढत त्याला सुयोग्य साथ दिली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी ४ बळी घेत सर्वाधिक यशवी गोलंदाज ठरला. मात्र त्यासाठी त्याने तब्बल १०९ मोजल्या. लेगस्पिनर यासिर शहाने त्याला साथ देत ११३ धावांत ३ गडी बाद केले.
पाकिस्तानची अडखळती सुरुवात
न्यूझीलंडच्या ४३१ धावांच्या प्रत्युतरात खेळायला उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात अडखळत झाली. संघाची धावसंख्या अवघी २८ झाली असताना सलामीवीर शान मसूदला वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने माघारी पाठवले. मसूदने ४२ चेंडूत १० धावा काढल्या. मात्र त्यांनतर नाईट वाॅचमन म्हणून आलेल्या मोहम्मद अब्बासने उर्वरित चेंडू खेळून काढत अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानने १ बाद ३० धावा केल्या आहेत. सलामीवीर आबिद अली 19 तर मोहम्मद अब्बास ० धावांवर नाबाद आहेत. पहिल्या डावात पाकिस्तान अजूनही ४०१ धावांनी पिछाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या:
– मोठी बातमी! दशकातील सर्वोत्तम आयसीसी टी२० संघाचा एमएस धोनी कर्णधार, या तीन भारतीयांनाही मिळाले स्थान
– IND vs AUS : रहाणे-जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ ८२ धावांनी आघाडीवर
– पाहुणा नंबर १..! मेलबर्नच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा अजिंक्य रहाणे पहिलाच परदेशी क्रिकेटर