---Advertisement---

सँटनरचा अविश्वसनीय झेल! व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वाह बेटे मौज कर दी’

Mitchell Santner
---Advertisement---

सध्या न्यूझीलंड संघ युएई दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड संघ आणि युएई संघ तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात यूएईने ऐतिहासिक विजय नोंदवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फिरकीपटू मिचेल सँटनरने गोलंदाजी करताना अप्रतिम झेल घेतला. त्याने घेतलेल्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिचेल सँटनर (Mitchell Santner) च्या या झेलला तुम्ही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलांपैकी एक झेल म्हणू शकता. क्रिकेटच्या प्रगतीबरोबर खेळाच्या पद्धतीही बदलत आहेत. आता क्षेत्ररक्षक अगदी वेगळ्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाचा सराव करतात. जेणेकरून ते सामन्यातील एकही संधी त्यांच्या हातून सुटू नये याच प्रयत्नात असतात. गोलंदाजी करताना सँटनरच्याने यूएईच्या फलंदाज आसिफ खानला चेंडू टाकला, जो तो समजू शकला नाही.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1692722114573594769?s=20

चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि लेग साइडच्या दिशेने जाऊ लागला. चेंडू दूर जात असल्याचे पाहून सँटनरने लांब उडी घेत एका हाताने झेल टिपला. हा झेल घेण्यासाठी सँटनरने स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले आणि तो झेल घेण्यात तो यशस्वीही झाला. या झेलमुळे यूएई फलंदाज असिफ खान 10 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 13 धावा करून तंबूत परतला.

युएईने दुसरा ऐतिहासिक सामना जिंकला
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर यूएईने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत ऐतिहासिक विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 142 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना युएईने अवघ्या 15.4 चेंडूत 3 गडी राखून लक्ष्य गाठले. तर आता दोघांचा तिसरा आणि निर्णायक सामना 20 ऑगस्टला रविवारी होणार आहे. (new zealand vs uae mitchell santner took fabulous catch)

महत्वाच्या बातम्या-
आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’
‘पहिल्यांदाच भारतीय खेळाडूशिवाय ड्रेसिंग रूम…’, CPL 2023मध्ये रायुडूला झाली टीम इंडियाची आठवण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---